Home बातम्या Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये

Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये

Samsung साठी साल 2019 खास होता. यावर्षी कंपनीने आपल्या लो बजेट आणि मीड बजेट डिवाईसेज मध्ये मोठे बदल केले आहेत. ‘गॅलेक्सी एम सीरीज’ आणि ‘गॅलेक्सी ए सीरीज’ सह Samsung ने फक्त आपली जागा वाचवली नाही तर चीनी कंपन्यांना चांगली टक्कर पण दिली आहे. Samsung च्या या दोन्ही स्मार्टफोन सीरीज लोकांना आवडल्या आहेत. आता बातमी येत आहे कि Samsung आपल्या गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्स वर काम सुरु केले आहे आणि यात Samsung Galaxy A11, Samsung Galaxy A31 आणि Samsung Galaxy A41 चा समावेश आहे.

Samsung Galaxy A सीरीज संबंधित हि बातमी एका वेबासाइट एमएसपी च्या माध्यमातून मिळाली आहे. वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि Samsung पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत जे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे त्यातील Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची डेवलेपमेंट सुरु करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार Galaxy A11 चा मॉडेल नंबर SM-A115X असेल. Samsung Galaxy A31 चा मॉडेल नंबर SM-A315X आणि Samsung Galaxy A41 चा मॉडेल नंबर SM-A415X असेल.

हे देखील वाचा: Samsung चा दमदार स्मार्टफोन Galaxy Note 10 Lite झाला गीकबेंच वर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

128 जीबी स्टोरेज असेल

समोर आलेल्या रिपोर्टनुसार पुढल्या वर्षी लॉन्च होणाऱ्या गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये कंपनी यावर्षीच्या मॉडेल्स पेक्षा जास्त स्टोरेज देईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy A चे हे स्मार्टफोन्स 128 जीबी पर्यंतच्या स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च केले जातील. तसेच या स्मार्टफोन्सच्या बेस वेरिएंट मध्ये 64 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. रिपोर्टनुसार उपरोक्त तिन्ही स्मार्टफोन कंपनी मीड बजेट रेंज मध्ये लॉन्च करेल.

Samsung Galaxy A51

91मोबाईल्सने आधीच सांगितले आहे कि सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्टरी मध्ये Galaxy A51 ची निर्मिती सुरु झाली आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात येईल. हा स्मार्टफोन सॅमसंगचा सर्वात स्वस्त क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन असू शकतो. फोनच्या बॅक पॅनल वर L-शेप असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. एका रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर + 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस + 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसिंग सेंसर + 5 मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली जाईल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट पंच-होल कॅमेरा मिळू शकतो.

हे देखील वाचा: Realme X50 5G आणि X50 Lite (Youth Edition) 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळू शकतो. रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि हा स्मार्टफोन 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.