Samsung Galaxy A12 च्या इंडिया लॉन्चबद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी फोनचे प्रोडक्ट पेज सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव झाला होता, त्यानंतर चर्चा सुरु झाली होती कि फोन लवकरच इंडिया मार्केट मध्ये सादर केला जाऊ शकतो. आता 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून एक्सक्लूसिवली फोनची किंमत माहिती मिळाली आहे. आम्हाला मिळालेल्या रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे कि फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल.
Samsung Galaxy A12 ची किंमत
आमच्या सूत्रांच्यामते Galaxy A12 चा बेस वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला जाईल, ज्याची किंमत 12,999 रुपये असेल. कंपनी 4GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांमध्ये सादर करेल. तसेच फोन काही दिवसांत ऑफिशियल सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा
Samsung Galaxy A12 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए12 नोव्हेंबर मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. आशा आहे कि गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन भारतीय बाजारात मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट सह विकला जाईल. सॅमसंग इंडियावर फोनच्या सपोर्ट पेज वर 4 जीबी रॅम दाखवण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S9 5G, समोर आली महत्वाची माहिती
Samsung Galaxy A12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोन साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन आगामी काही दिवसांत Black, Blue, White आणि Red कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
