Home बातम्या Samsung Galaxy A16 5G आणि A16 4G चे स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी आले समोर, जाणून घ्या स्वस्त फोनमध्ये काय मिळेल

Samsung Galaxy A16 5G आणि A16 4G चे स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी आले समोर, जाणून घ्या स्वस्त फोनमध्ये काय मिळेल

Samsung आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो गॅलेक्सी ए 16 नावाने येईल. बातमी आहे की हे मोबाईल 4 जी आणि 5 जी दोन्ही मॉडेलमध्ये येतील जे Galaxy A16 5G आणि Galaxy A16 4G नावाने ​विकले जातील. कंपनीने परंतु अजून या स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही मात्र एका लीकमध्ये दोन्ही मॉडेलचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए 15 5 जी आणि गॅलेक्सी ए 16 4 जी ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A16 5G / A16 4G चे स्पेसिफिकेशन (लीक)

डिस्प्ले

समोर आलेल्या लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए 16 4 जी आणि 5 जी फोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाईल. लीकनुसार ही पंच-होल स्टाईल असणारी स्क्रीन असेल जी सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली आहे, तसेच 90 हर्ट्स रिफ्रेश रेटवर काम करेल. माहितीनुसार Galaxy A16 चे दोन्ही मॉडेलची थिकनेस 7.99 मिलीमीटर आहे.

प्रोसेसर

समोर आलेल्या माहितीनुसार Samsung Galaxy A16 5G फोनमध्ये ब्रँडचा हा Exynos 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. या 8-कोर सीपीयू मध्ये 2.0 गीगाहर्ट्स क्लॉक स्पीड असलेल्या 6 कोर तसेच 2.2 गीगाहर्ट्स पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करणारे 2 कोर असतील. लीकमध्ये सध्या Galaxy A16 4G च्या चिपसेटचे नाव समोर आले नाही, मात्र हे जरूर सांगण्यात आले आहे की या फोनचा प्रोसेसर पण 2.2GHz स्पीड असलेला असेल.

मेमरी

लीकमध्ये अगामी सॅमसंग स्मार्टफोनच्या दोन्ही व्हर्जनमध्ये 4GB RAM दिले जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु या गोष्टीची पूर्ण आशा आहे की ये दोन्ही मॉडेल दोन पेक्षा अधिक व्हेरिएंटमध्ये येतील, ज्यामध्ये 6 जीबी किंवा 8 जीबी रॅम पण मिळू शकते. तसेच लेटेस्ट लीकमध्ये या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 128GB Storage दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार Galaxy A16 4G मध्ये 1TB आणि A16 5G मध्ये 1.5TB चे मेमरी कार्ड लावले जाईल.

कॅमेरा

फोटोग्राफीच्या बाबतीत गॅलेक्सी ए 16 4 जी आणि 5 जी दोन्ही मॉडेल एक सारखे असतील. लीकनुसार याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल मेन सेन्सर दिला जाईल ज्याच्यासोबत 5 मेगापिक्सल Ultra Wide अँगल लेस तसेच 2 मेगापिक्सल Macro सेन्सर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy A16 4G आणि Galaxy A16 5G मध्ये 13MP Selfie कॅमेरा दिला जाणार असल्याची गोष्ट लीकमध्ये समोर आली आहे.

बॅटरी

पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए 16 5 जी आणि ए 16 4 जी फोनला 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणले जाईल. तसेच लीकनुसार हे दोन्ही मोबाईल फोन 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

इतर फिचर्स

लीकमध्ये समोर आले आहे की Samsung Galaxy A16 5G आणि A16 4G फोन Bluetooth 5.3, Wi-Fi 5GHz आणि NFC सह असेल. तसेच फोनच्या 5 जी व्हर्जनला IP54 सर्टिफाईड केले जाणार असल्याची गोष्ट पण लीकमध्ये सांगितली गेली आहे. या दोन्ही मोबाईलचे वजन 200 ग्रॅम सांगण्यात आले आहे.

Samsung Galaxy A16 5G / A16 4G किंमत (अंदाजे)

सर्वप्रथम तर तुम्हाला सांगतो की सॅमसंग भारताच्या वेबसाईटवर गॅलेक्सी ए 16 5 जी फोन काला सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे जे दर्शविते आहे की हा मोबाईल लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेईल. तसेच आमचा अंदाज आहे की भारतात गॅलेक्सी ए 16 5 जी फोनची किंमत 13,499 रुपयांच्या आसपास ठेवली जाईल. तसेच गॅलेक्सी ए 16 4 जी फोनला 9,999 रुपये पर्यंतच्या रेंज मध्ये लाँच केले जाऊ शकते. आणखी माहितीसाठी कंपनीची घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे.