Home बातम्या Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy A20s झाला अजून स्वस्त, प्राइस कट नंतर एवढी असेल किंमत

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy A20s झाला अजून स्वस्त, प्राइस कट नंतर एवढी असेल किंमत

Samsung ने गेल्या महिन्यात आपल्या फॅन्सने भेट देत ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy A20s अजून स्वस्त केला होता. कंपनीने फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत थेट 1,000 रुपयांची कपात केली होती, ज्यामुळे 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला होता. आता कंपनीने Samsung Galaxy A20s च्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत पण कमी केली आहे. कंपनीने या फोन वेरिएंटची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे.

सर्वात आधी सांगू इच्छितो Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी तसेच 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेजचा समावेश होता. फोनचा 3 जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तसेच फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटने 13,999 रुपयांमध्ये मार्केट मध्ये एंट्री घेतली होती. कंपनीने आता गॅलेक्सी ए20एस च्या 4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे ज्यामुळे हा डिवाईस 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy A20s ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर नवीन किंमतींसह सेलसाठी उपलब्ध झाला आहे तसेच हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A20s

सॅमसंग गॅलेक्सी ए20एस चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5 इंचाच्या एचडी+ Infinity V डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.4डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. Samsung Galaxy A20s एंडरॉयड 9 पाई आधारित वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वरील क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A20s डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत एफएम रेडियो पण आहे. सिक्योरिटी साठी हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A20s मध्ये 4000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.