Home बातम्या Samsung Galaxy A20s ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Samsung Galaxy A20s ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Samsung ने ऑक्टोबर मध्ये भारतात आपल्या गॅलेक्सी ‘ए सीरीज’ अंतर्गत Galaxy A20s स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा डिवाईस दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी तसेच 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेजचा समावेश होता. फोनचा 3 जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तसेच फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंटने 13,999 रुपयांमध्ये मार्केट मध्ये एंट्री घेतील होती. आता आता सॅमसंगने आपल्या या फोनची किंमत कमी केली आहे. प्राइस कट नंतर Samsung Galaxy A20s चा 3 जीबी रॅम वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा प्राइस कट ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण झाला आहे तसेच हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20एस चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5 इंचाच्या एचडी+ Infinity V डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.4डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. Samsung Galaxy A20s एंडरॉयड 9 पाई आधारित वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वरील क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू आहे.

Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A20s डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत एफएम रेडियो पण आहे. सिक्योरिटी साठी हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A20s मध्ये 4000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.