Home बातम्या Samsung Galaxy A21s चा प्रोमोशनल वीडियो लीक, लवकरच होईल भारतात लॉन्च

Samsung Galaxy A21s चा प्रोमोशनल वीडियो लीक, लवकरच होईल भारतात लॉन्च

Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीजच्या नवीन फोन वर काम करत आहे जो Galaxy A21s नावाने लॉन्च केला जाईल. सॅमसंगने अजूनतरी या फोन बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण फोन लॉन्चच्या आधी 91मोबाईल्सला या फोनचा प्रोमोशनल वीडियो मिळाला आहे. या वीडियो मध्ये स्पष्टपणे Samsung Galaxy A21s चे नाव प्रोमोट केले गेले आहे. वीडियो समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग आता लवकरच आपला हा स्मार्टफोन सादर करेल.

91मोबाईल्सला हा फोनचा प्रोमोशनल वीडियो खात्रीलायक सूत्रांकडून मिळाला आहे. Samsung Galaxy A21s च्या या प्रोमोशनल वीडियो मध्ये फोनचे कॅमेरा फीचर्स दाखवण्यात आले आहेत. यात लाईव कॅमेरा फोटोज व लाईव वीडियोज थेट सोशल मीडिया ऍप्स वर अपलोड करताना दाखवण्यात आले आहेत. फोनच्या कॅमेरा ऍप मध्ये एआर डूडल सारखा फीचर पण दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन Black, White आणि Blue कलर मध्ये लॉन्च होईल.

Samsung Galaxy A21s

वेगवेगळ्या लीक्स आणि सर्टिफिकेशन्स साइट्स वर गॅलेक्सी ए21एस चे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. लीकनुसार हा फोन 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ आईपीएस डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार सॅमसंगचा हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. फोन मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

Samsung Galaxy A21s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर दिला जाऊ शकतो. आशा आहे कि हे सेंसर्स अल्ट्रा वाइड अँगल लेंस, पोर्टरेट लेंस आणि डेफ्थ सेंसर असतील. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए21एस एक डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोन मध्ये FS स्कॅनर, माइक्रो यूएसबी पोर्ट, एनएफसी कनेक्टिविटी, 3.5एमएम हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.0 सारखी बेसिक कनेक्टिविटी मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी Galaxy A21s मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. आशा आहे कि सॅमसंग लवकरच गॅलेक्सी ए21एस ची लॉन्च डेट सांगेल.