Samsung Galaxy A21s या महिन्याच्या सुरवातीला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला होता. या लिस्टिंग मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. आता हा डिवाइस यूएसच्या FCC सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे, जिथे अशी माहिती समोर आली आहे कि Galaxy A21s या महिन्यात लॉन्च झालेल्या Galaxy A21 चा रिफाइन वर्जन असेल.
एफसीसी डॉक्युमेंट्स वरून सॅमसंग गॅलेक्सी ए 21 च्या डिस्प्लेचा आकार, डायमेंशन, वेग्वेगळ्या नेटवर्क बॅंडचा सपोर्ट आणि डुअल बॅंड वाई-फाई ची माहिती समोर आली आहे. सॅमसंग कधी हा स्मार्टफोन लॉन्च करेल सध्या याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
MySmartPrice ने बघितलेल्या FCC डॉक्युमेंट्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A21 मध्ये A21 प्रमाणे 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळेल आणि फोन 15W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच हँडसेट GSM1900, LTE2, WCDMA1900, WCDMA1700 LTE66, LTE41 आणि GSM850 नेटवर्क बॅंडला सपोर्ट करेल. तसेच आहे डुअल-बॅंड वाई-फाई कनेक्टिविटी सह येईल. इतकेच नव्हे तर हा स्मार्टफोन 163.7 मिमी x 75.3 मिमी डाइमेंशन सह येईल. डॉक्युमेंटन्स मध्ये गॅलेक्सी ए 21 च्या जास्त स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती समोर आलेली नाही. प गीकबेंच लिस्टिंग मध्ये फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले होते.
गीकबेंच लिस्टिंग नुसार फोन मध्ये Exynos 850 SoC असेल. तसेच हा फोन 3 जीबी रॅम सह येईल आणि वन यूआई 2.0 सह एंड्रॉइड 10 वर चालेल. सॅमसंग गॅलेक्सी ए 21 एस ब्लू, ब्लॅक, व्हाइट आणि रेड कलर ऑप्शन मध्ये आणि 32 जीबी / 64 जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध होईल. Samsung Galaxy A21s इंडियन मार्केट मध्ये येईल या कि नाही हे अजून निश्चित समजले नाही.
Samsung Galaxy A21
सॅमसंग गॅलेक्सी ए21 फोन 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दोन्ही फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए21 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मेमरी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्या सोबत 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 4,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
