Home बातम्या Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट

Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट

Highlights
  • सॅमसंग 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचे नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते.
  • या दिवशी Samsung Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात एंट्री करू शकतात.
  • या दोन्ही सॅमसंग फोन्सचं सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे.

सॅमसंगनं घोषणा केली आहे की येत्या 16 मार्चला भारतात ‘गॅलेक्सी ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाईल. कंपनीनं या घोषणेत सीरीजमधील स्मार्टफोनचं नाव सांगितलं नाही परंतु आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की 16 मार्चला Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही फोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आणि गॅलेक्सी ए54 5जी फोन 16 मार्चला भारतात लाँच होऊ शकतात. आम्हाला रिटेल स्टोरच्या माध्यमातून टीजर पोस्टर मिळाला आहे ज्यात या मोबाइल्सचा फोटो आणि नाव दिसत आहे. तसेच या दोन्ही स्मार्टफोन्सचं सपोर्ट पेज देखील सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे.

सॅमसंग इंडिया वेबसाइटवर लाइव्ह झालेल्या सपोर्ट पेजवर दोन्ही मोबाइल्सच्या रॅम व्हेरिएंट्सचा खुलासा देखील झाला आहे. Samsung Galaxy A54 5G फोन 8 जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे तर Samsung Galaxy A34 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅमचा समावेश आहे. आशा आहे हे दोन्ही फोन याच व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये विकले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी आणि गॅलेक्सी ए54 5जी ची लीक किंमत

इंडिया लाँच डेट समोर येण्यापुरवही या दोन्ही मोबाइल फोन्सची ग्लोबल प्राइस लीक करण्यात आली आहे. स्नूपीटेक नावाच्या एका एक टिपस्टरनं या स्मार्टफोन्सची युरोपियन किंमत शेयर केली होती. लीकमध्ये 128जीबी स्टोरेज असलेल्या Samsung Galaxy A34 5G ची किंमत EUR 419 सांगण्यात आली होती जी 35,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. तर Samsung Galaxy A54 5G च्या 128जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत EUR 519 (जवळपास 45,400 रुपये) असू शकते असं सांगण्यात आलं होतं. या सॅमसंग फोन्सची किंमत भारतात यापेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी चे लीक स्पेसिफिकेशन्स

91मोबाइल्सला काही दिवसांपूर्वी मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी 34 5जी मध्ये देखील 6.6 इंचाचा लार्ज फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. हा फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालू शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सल मॅक्रो/बोका लेन्स मिळू शकते. Samsung Galaxy A34 13 मेगापिक्सल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करू शकतो. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो तसेच हा मोबाइल आयपी67 सर्टिफाइड असू शकतो.

Samsung Galaxy A54 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी 54 5जी 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. यात कंपनीचा एक्सनॉस 1380 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करू शकतो.

Samsung Galaxy A54 च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सल प्रायमरी दिला जाऊ शकतो. जोडीला एफ/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तर एफ/2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हा फोन आयपी67 रेटेड असेल, ज्याच्या जोडीला ड्युअल सिम, एनएफसी, ओटीजी आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतील.