Home बातम्या Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स

Samsung Galaxy A51 आणि A71 झाले अजून स्वस्त, जाणून घ्या आता कोणत्या किंमतीत मिळत आहेत हे पावरफुल फोन्स

पुन्हा एकदा जगात सर्वात जास्त विकला जाणारा लोकप्रिय एंडरॉयड स्मार्टफोन Samsung Galaxy A51 भारतात स्वस्त झाला आहे. यावेळी ‘A’ सीरीजच्या गॅलेक्सी ए51 सह कंपनीने गॅलेक्सी ए71 ची किंमत पण कमी केली आहे. हे फोन्स कमी किंमतीत ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोर्स वर विकत घेता येतील. चला जाणून घेऊया प्राइस कट नंतर दोन्ही फोन्स कोणत्या किंमतीत विकले जात आहेत.

91मोबाईल्सला दोन्ही फोन्सच्या किंमत मध्ये कपात झाल्याची माहिती मोबाईल रिटेल स्टोर्स कडून मिळाली आहे. सॅमसंगने Galaxy A-सीरीजचे हे दोन्ही डिवाइस यावर्षीच्या सुरवातीला सादर केले होते. तसेच यातील Samsung Galaxy A51 ला काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात जास्त विकला जाणारा लोकप्रिय पॉप्युलर एंडरॉयड स्मार्टफोनचा अवॉर्ड मिळाला होता.

नवीन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए51 बद्दल बोलायचे झाले तर या फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता ऑफलाइन 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ग्राहक या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज ऑप्शन 25,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतात. या किंमतीत फोन कंपनीच्या साइट वर पण लिस्ट आहे.

गॅलेक्सी ए71 फक्त 8GB रॅम आणि 128GB मेमरी सह येतो. हा डिवाइस आता ऑफलाइन स्टोर्स वर 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर फोन याच किंमतीत विकला जात आहे.

विशेष म्हणजे जीएसटीचे दर वाढल्यामुळे इतर मोबाईल फोन कंपन्यांसोबतच सॅमसंगने पण आपल्या फोन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण आता कंपनी आपल्या फोन्सच्या किंमती कमी करत आहे.

Galaxy A71

Galaxy A71 आणि Galaxy A51 सोबत कंपनीने इंडस्ट्री फर्स्ट इनोवेशन Quick Switch फिचर सादर केला होता, त्याचबरोबर “On-Device AI” आधारित Content Suggestions पण प्राइवेसीला अजून सिक्योर बनवतो. GenZ आणि Millennials आज रोज प्राइवेसी इश्यूचा सामना करतात आणि याच गोष्टी लक्षात ठेऊन Quick Switch सारखा यूनिक सोल्युशन तयार केला गेला होता.

Samsung Galaxy A71 च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

Samsung Galaxy A51 च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी ए51 वीडियो