Samsung ने ग्लोबल मार्केट मध्ये गॅलेक्सी ए सीरीजचे Galaxy A51 आणि Galaxy A71 लॉन्च केल्यानंतर इंडियन मोबाईल यूजर्स या फोन्सची वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी सॅमसंगने आपल्या अधिकृत वेबसाइट वर ‘Galaxy A’ सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवले होते तेव्हापासून चर्चेला उधाण आले होते कि कंपनी लवकरच गॅलेक्सी ए51 आणि गॅलेक्सी ए71 भारतात लॉन्च करणार आहे. आता सॅमसंग इंडियाने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी या 29 जानेवारीला भारतात Samsung Galaxy A51 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
सॅमसंगने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि येत्या 29 जानेवारीला गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy A51 भारतात लॉन्च केला जाईल. ट्वीटर वर सॅमसंग हॅशटॅग #AwesomeIsForEveryone सह हा स्मार्टफोन टीज करत आहे. Samsung Galaxy A51 च्या लॉन्च डेट आणि याच्या नावासोबत सॅमसंगने स्पष्ट केले आहे कि सध्या 29 जानेवारीला फक्त गॅलेक्सी ए51 स्मार्टफोनच लॉन्च केला जाईल पण भारतीय फॅन्सना Samsung Galaxy A71 साठी अजून थोडी वाट बघावी लागेल.
Awesome’s just about here. 2 days to go! #GalaxyA coming soon. #AwesomeIsForEveryone
Get notified: https://t.co/Nhb31XQrfw pic.twitter.com/hOq95lBTaF— Samsung India (@SamsungIndia) January 27, 2020
Samsung Galaxy A51 या 29 जानेवारीला लॉन्च झाल्यानंतर कोणत्या तारखेला सेलसाठी उपलब्ध होईल आणि फोनची किंमत किती असेल, यासाठी फोन लॉन्चची वाट बघावी लागेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी ए51 कंपनी सॉफ्ट लॉन्चच्या माध्यमातून बाजारात आणेल आणि हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. 91मोबाईल्सला सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती Samsung Galaxy A51 भारतीय बाजारात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी ए51 किती वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल हे दोन दिवसानंतर समजले.
Samsung Galaxy A51
गॅलेक्सी ए51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5-इंच, फुल एचडी+ (1080 x2400) सुपर AMOLED इनफिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन सॅमसंगच्या Exynos 9611 चिपसेट ऑक्टा कोर (क्वाड 2.3GHz + क्वाड 1.7GHz) प्रोसेसर सह येईल. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅम ऑप्शन वर लॉन्च झाला होता ज्यासोबत 64GB व 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48MP, F2.0 सह डेप्थ मेन सेंसर, 5MP, F2.2 मेक्रो सेंसर, 5MP, F2.4 अल्ट्रा-वाइड आणि 12MP, F2.2 सेंसर आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W फास्ट चार्जिंग सह येते.
