91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात Samsung च्या आगामी स्मार्टफोन Galaxy A51 चे फोटोज शेयर केले होते. हे फोटोज फोनच्या मॅन्युफैक्चरिंग स्टेजचे होते, ज्यात फोनचा इंटरनल पॅनल दिसला होता. फोनचे फोटोज शेयर कारण्यासोबतच आम्ही सांगितले होते कि सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्टरी मध्ये Galaxy A51 ची निर्मिती सुरु झाली आहे आणि लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येईल. आज Samsung Galaxy A51 ची रेंडर ईमेज पण समोर आली आहे. हे फोटोज टेक वेबसाइट प्राइस बाबा ने शेयर केले आहेत, ज्यात फोनच्या फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्सचा फुलव्यू मिळत आहे.
असा असेल लुक
Samsung Galaxy A51 पंच-होल डिस्प्ले सह दिसत आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे ज्यावर वरच्या बाजूला मधोमध छोटासा होल आहे. या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये Galaxy A51 चा डिस्प्ले चारही बाजुंनी फुल बेजल लेस दिसत आहे. फोनचा बॅक पॅनल पाहता इथे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे.
Galaxy A51 चा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये चार लेंस आहेत ज्या L-शेप मध्ये आहेत. तीन सेंसर एकाच रेषेत आहेत तर चौथा सेंसर खाली उजवीकडे आहे. या चौथ्या सेंसरच्या वर फ्लॅश लाईट आहे. Samsung Galaxy A51 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Samsung ची ब्रँडिंग आहे.
हे देखील वाचा: Exclusive: नोव्हेंबर मध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन M सीरीज फोन, नाव असू शकते Galaxy M50
Samsung Galaxy A51 च्या लोवर पॅनल वर मधोमध यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. या पोर्टच्या उजवीकडे 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तर डावीकडे स्पीकर ग्रिल आहे. गॅलेक्सी ए51 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहेत तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. Samsung Galaxy A51 फोटोज मध्ये खूप ग्लॉसी दिसत आहे ज्यावरून वाटते कि या फोनच्या बॅक पॅनल वर पण ग्लास लेयर असेल.
स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळेल.
हे देखील वाचा: Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च
Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाईड एंगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.
