Samsung Galaxy A सीरीजच्या मिड-रेंज स्मार्टफोनना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून आता बातमी समोर येत आहे कि कंपनी लवकरच A-सीरीजचा नवीन फोन मार्केट मध्ये सादर करू शकते. दक्षिण कोरियन कंपनीद्वारे गॅलेक्सी ए51 चा 5जी वेरियंट लॉन्च झाल्यानंतर जवळपास 1 वर्षानंतर याचा अपग्रेडेड वेरियंट म्हणजे गॅलेक्सी ए52 लवकरच बाजारात येऊ शकतो. या नवीन डिवाइस बद्दल माहिती येण्यास सुरवात झाली आहे. तसेच आता हा फोन SM-A526B मॉडेल नंबर सह बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे.
मॉडेल नंबर पाहून बोलले जात आहे कि हा फोन Galaxy A52 असेल जो गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy A51 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून येईल. Geekbench लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन 1.8GHz ऑक्टा-कोर SoC सह कोडनेम ‘lito’ वर सादर केला जाईल. तसेच डिवाइस मध्ये एड्रिनो 619GPU, 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल.
हे देखील वाचा : Exclusive: क्वाड कॅमेरा आणि ड्यूल टोन-डिजाइन सह येईल Samsung Galaxy M12, रियर पॅनल आला समोर
Samsung Galaxy A52 5G
सॅमसंग SM-A526B ने सिंगल-कोर टेस्ट मध्ये 298 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1001 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच लिस्टिंग वरून असे पण समजले आहे कि स्मार्टफोन 1.80 बेस क्लॉक फ्रिक्वेन्सी आणि कोड नाव ‘लिटो’ सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येईल. गीकबेंच लिस्टिंगमसूर, असे वाटते कि सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750 जी SoC वर सादर केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 750G SoC वरून स्पष्ट झाले आहे कि गॅलेक्सी A52 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल.
हे देखील वाचा : दमदार 256GB स्टोरेज सह येत आहे Samsung Galaxy M62, लवकरच करेल एंट्री
Geekbench लिस्टिंग मध्ये असे पण समजले आहे कि फोन मध्ये Adreno 619GPU सह 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ओएस असेल. याआधी Galaxy Club ने आगामी गॅलेक्सी ए52 संबंधित माहिती सार्वजनिक केली होती. रिपोर्ट मध्ये आगामी फोनच्या रियर कॅमेरा सेटअपचा खुलासा केला गेला आहे. Galaxy Club चा दावा आहे कि फोन मध्ये आधीच्या वेरियंट प्रमाणेच 4 कॅमेरा दिले जातील. यात प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर तीन सेंसर आधीप्रमाणेच (अल्ट्रा-वाइड, मॅक्रो, डेप्थ) असतील. इतर सेंसरच्या मेगापिक्सल रेजॉलूशन बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
अपकमिंग गॅलेक्सी ए52 मध्ये माहिती येण्याची हि पहिली वेळ नाही. सॅमसंगने 2020 च्या सुरवातीला गॅलेक्सी सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स सोबत या नावाचा एक फोन रजिस्टर केला होता. पण याच्या नवीन फीचर्स बाबत दुसऱ्यांदा लीक मध्ये माहिती समोर आली आहे.
