Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन काल कंपनीनं जागतिक बाजारात लाँच केले होते. आज कंपनीनं Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G फोन भारतात सादर केले आहेत. दोन्ही फोन्समध्ये सुपर अॅमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, OIS असलेला मेन कॅमेरा, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. पुढे या स्मार्टफोन्सच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.
Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G हे दोन्ही फोन्स भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोन्सच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM सह 128GB स्टोरेज मिळते तर मोठ्या मॉडेलमध्ये 8GB RAM सह 256GB स्टोरेज मिळते. हे फोन्स 28 मार्चपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील, तर 16 मार्चपासून प्री बुकिंग सुरु होईल. कंपनी या फोन्सवर 3,000 रुपयांचा बँक कॅशबॅक देखील देत आहे.
Galaxy A54 5G च्या 128GB मॉडेलची किंमत 38,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 256GB मॉडेल 40,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Galaxy A34 5G चा 128GB मॉडेल 30,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 256GB मॉडेलची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Galaxy A54 5G मध्ये 6.4-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक पंच होल स्टाइल डिस्प्ले आहे, जो व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. फोनचे डायमेन्शन 158.2 x 76.7 x 8.2एमएम आणि वजन 202 ग्राम आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्ट असलेला 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो ज्याचं अपर्चर एफ 1.8 आहे. जोडीला एफ 2.2 अपर्चरसह 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. सॅमसंगची Knox सिक्योरिटी देखील यात मिळते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.
Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी सपोर्ट करतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनचे डायमेन्शन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199 ग्राम आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 48MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ 2.2 अपर्चरसह 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चरसह 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते, ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. कंपनीनं यात Samsung Knox फिचर देखील दिलं आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.