Home बातम्या Samsung चे दोन 5G Phone याच महिन्यात येणार भारतात; Galaxy A54 आणि Galaxy A34 च्या लाँचची माहिती लीक

Samsung चे दोन 5G Phone याच महिन्यात येणार भारतात; Galaxy A54 आणि Galaxy A34 च्या लाँचची माहिती लीक

Highlights
  • Galaxy A54 आणि Galaxy A34 स्मार्टफोन 15 मार्चला जागतिक बाजारात लाँच होतील.
  • ग्लोबल लाँचनंतर काही दिवसांनी भारतीयांच्या भेटीला हे फोन येतील.
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जवळपास सारखीच डिजाईन मिळेल.

काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung नं आपले दणकट फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S23 series अंतर्गत भारतात सादर केले होते. हे फोन्स प्रीमियम सेगमेंटमध्ये येत असल्यामुळे सर्वांच्या बजेटमध्ये बसत नाहीत. त्यामुळे कंपनी लवकरच आता मिडरेंजमधील Galaxy A-series कडे वळणार आहे. अलीकडेच आलेल्या रिपोर्ट्सनुसार Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G हे दोन स्मार्टफोन 15 मार्चला जागतिक बाजारात लाँच केले जातील. आता नवीन लिक्समधून या स्मार्टफोन्सच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे.

Galaxy A54 आणि Galaxy A34 भारतीय लाँच

प्रसिद्ध टिपस्टर देबायन रॉयनुसार Galaxy A54 आणि Galaxy A34 हे दोन्ही स्मार्टफोन भारतात मार्चच्या अखेरीस लाँच केले जातील. सॅमसंगचे फोन जागतिक बाजारात लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी भारतीय बाजारात दाखल होत असतात, त्यामुळे ही लीक बातमी खरी ठरण्याची शक्यता जास्त आहे. पुढे आम्ही या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लीक स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy A54 चे लीक स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी 54 स्मार्टफोन 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होईल जो सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन कंपनीच्या एक्सनॉस 1380 प्रोसेसरवर काम करेल तसेच मार्केटमध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB च्या दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A54 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स असेल. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए54 इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल. हा फोन आयपी67 रेटेड असेल त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. अँड्रॉइड आधारित वनयुआय 5 सोबतच Galaxy A54 मध्ये ड्युअल सिम, एनएफसी, ओटीजी आणि 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतील.

Samsung Galaxy A34 चे लीक स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए34 मध्ये कंपनी 2340 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.6 इंचाचा लार्ज फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनचे डायमेंशन 161.3 x 78.1 x 8.2एमएम आणि वजन 199ग्राम असेल. हा वॉटरप्रूफ मोबाइल देखील आयपी67 सर्टिफाइड असेल, जो 1 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे सुरक्षित राहू शकतो.

Samsung Galaxy A34 अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5 वर सादर केला जाईल जो मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर काम करेल. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह लाँच केला जाईल. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो/बोका लेन्स दिली जाईल. Samsung Galaxy A34 13 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल तसेच अन्य कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स गॅलेक्सी ए54 सारखे असतील.