सॅमसंग कंपनी भारतीय मोबाईल बाजारावर अनेक वर्षांपासून राज्य करत आहे. देशात आपल्या स्मार्टफोंस ची संख्या वाढवत दिग्गज कंपनी ने नवीन स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केले आहेत. सॅमसंग ने भारतात गॅलेक्सी ए6 तसेच गॅलेक्सी ए6+ स्मार्टफोन सादर केले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी जे6 सीरीज कमी बजेट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे तर गॅलेक्सी ए सीरीज ची रेंज थोडी जास्त ठेवण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए6+
सॅमसंग ने गॅलेक्सी ए6+ स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला आहे जो इनफिनिटी डिस्प्ले ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने गॅलेक्सी ए6+ च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या दोन्ही पॅनल वर फ्लॅश लाईट आहे. तसेच पावर बॅकअप साठी 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए6
गॅलेक्सी ए6 स्मार्टफोन पण कंपनी ने इनफिनिटी डिस्प्ले सह मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला आहे. या फोन मध्ये 5.6-इंचाची एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे तसेच सॅमसंग च्या एक्सनॉस 7 सीरीज च्या चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए6 च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. बेसिक क्नेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए6 चा 4जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 21,990 रुपये तर 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गॅलेक्सी ए6+ 25,990 रुपयांच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे जो 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए6 तसेच गॅलेक्सी ए6+ ईकॉमर्स साइट अमेजॉन इंडिया एक्सक्लूसिव आहेत. याव्यतिरिक्त सॅमसंग चे हे नवीन स्मार्टफोन पेटीएम, सॅमसंग शॉप तसेच सॅमसंग स्टोर वरून पण विकत घेता येतील.
