Home बातम्या सॅमसंग ने लॉन्च केला 3 रियर कॅमेरे असलेला फोन गॅलेक्सी ए7 (2018)

सॅमसंग ने लॉन्च केला 3 रियर कॅमेरे असलेला फोन गॅलेक्सी ए7 (2018)

सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला होता. कंपनी ने हा फोन गॅलेक्सी ए7 (2018) नावाने सादर केला होता जो सॅमसंग चा पहिला असा फोन आहे ज्याच्या बॅक पॅनल वर ३ कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. आज भारतातील आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी ए7 (2018) इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये पण लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) 23,990 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) ची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेग्मेंट आहे. स्पेसिफिकेशन्स ची सुरवात फोटोग्राफी डिपार्टमेंट ने केल्यास फोन च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ​वर्टिकल शेप मध्ये उजवीकडे आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. या 3 कॅमेरा सेंसर्स मध्ये एक कॅमेरा 24-मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.7 अपर्चर ला सपोर्ट करतो. तसेच एफ/2.2 अपर्चर असलेला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर रियर पॅनल वर आहे.

गॅलेक्सी ए7 (2018) बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन देण्यात आले नाही. हा फोन 6.0-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले ला सपोर्ट करतो तसेच फ्रंट पॅनल वर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंग ने आपला हा फोन एंडरॉयड ओरियो वर सादर केला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7885 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) इंडियन मार्केट मध्ये 2 वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरीचे पर्याय उपलब्द आहेत. फोनची इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

गॅलेक्सी ए7 (2018) 4जी फोन आहे जो एनएफसी सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोनच्या साईड पॅनल वरील पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,300एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो. सॅमसंग ने आपला हा दमदार फोन ब्लू, ब्लॅक, गोल्ड व पिंक कलर वेरिएंट मध्ये सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल. किंमत पाहता फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 23,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 28,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंग गॅलेक्सी ए7 (2018) 27 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल. तसेच 29 सप्टेंबर पासून हा फोन देशातील आॅफलाईन बाजारातून विकत घेता येईल.