Home बातम्या Samsung Galaxy A72 असेल कंपनीचा पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन, बघा किती असेल पावर

Samsung Galaxy A72 असेल कंपनीचा पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन, बघा किती असेल पावर

Samsung ने यावर्षीच्या सुरवातीला 64 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा असलेला आपला पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy A71 टेक मंचावर सादर केला होता. आपल्या लुक आणि स्पेसिफिकेशन्समुळे हा सॅमसंग फोन भारतीय यूजर्सना आवडला आहे जो सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज बातमी आली आहे कि सॅमसंग या स्मार्टफोनचा अपग्रेडेड मॉडेल Samsung Galaxy A72 नावाने लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि हा सॅमसंगचा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात 5 रियर कॅमेरा सेंसर्स दिले जातील.

Samsung Galaxy A72 ची माहिती एक लीकच्या माध्यमातून समोर आई आहे. लीक मध्ये दावा करण्यात आला आहे कि गॅलेक्सी ए72 सॅमसंग द्वारे पेंटा रियर कॅमेरा सेटअप सह बाजारात आणला जाईल. विशेष म्हणजे सॅमसंगने आतापर्यंत आपल्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये 5 रियर कॅमेरा सेंसर्स दिले नाहीत, त्यामुळे गॅलेक्सी ए72 पेंटा कॅमेराअसलेला सॅमसंगचा पहिला स्मार्टफोन असेल. या लीक मध्ये फोनच्या सर्व रियर कॅमेरा सेंसर्स सोबतच सेल्फी कॅमेऱ्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए72 च्या बॅक पॅनल वर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 3एक्स झूम क्षमताअसलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 5 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy A72 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Samsung Galaxy A71

Galaxy A71 बद्दल बोलायचे तर यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ (1080 x2400) सुपर ऐमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा कोर (डुअल 2.2GHz + हेक्सा 1.8GHz) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज तुम्ही माइक्रोसएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 64MP चा मेन डेप्थ सेंसर F1.8, 5MP मॅक्रो सेंसर F2.2, 5MP अल्ट्रा वाइड F2.4 आणि 12MP F2.2 सेंसर आहे. तसेच फ्रंट कॅमेरा फोन मध्ये 32MP चा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंग सह येते.