Home टॉप कलेक्शन Samsung Galaxy A80 आहे वेगळा या 5 कारणामुळे

Samsung Galaxy A80 आहे वेगळा या 5 कारणामुळे

साउथ कोरियन कंपनी सॅमसंग ने आपले दोन स्मार्टफोन Samsung Galaxy A80 आणि Samsung Galaxy A70 लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी A80 मध्ये स्लाइडर मॅकेनिजम सह रोटेटिंग कॅमेरा सारखा जबरदस्त फीचर देण्यात आला आहे, तर गॅलेक्सी A70 मध्ये वॉटरड्रॉप नॉच, इनफिनिटी यू डिस्प्ले आहे. दोन्ही फोन्स मध्ये अनेक शानदार वैशिष्ट्ये आहेत. पण आज आम्ही तुम्हाला इथे Galaxy A80 ती 5 वैशीष्ट्ये सांगणार आहोत जी याला मार्केट मधील दुसऱ्या स्मार्टफोन्स पेक्षा वेगळी बनवतात. चला तर मग बघूया या फोन मधील काही खास फीचर्स.

वेगळी डिजाइन
Samsung Galaxy A80 स्मार्टफोन च्या डिजाइन बद्दल बोलायचे तर हा सर्वात वेगळ्या आणि अनोख्या डिजाइन सह सादर केला गेला आहे. यात देण्यात आलेल्या रोटेटिंग कॅमेरा द्वारे सॅमसंग ने नव्या ट्रेंडची सुरवात केली आहे. जरी असे आपण याआधी ओपो एन1 आणि ओपो एन3 मध्ये बघितले असले तरी कोणत्याही फोन मध्ये तीन फ्रंट कॅमेऱ्यांचा वापर झालेला नाही. सॅमसंगने या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच केला आहे.

याचा अर्थ असा कि कि सॅमसंग ने या नवीन फोन मध्ये रोटेटिंग स्लाईडर पॅनल दिला आहे. सेल्फीची कमांड देताच हा स्लाईडर पॅनल वर येतो आणि फोन बॉडी बाहेर येतो. पॅनल वर आल्यानंतर संपूर्ण रियर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो.

शानदार कॅमेरा
सॅमसंग गॅलेक्सी A80 कंपनीचा पहिला फोन आहे, ज्यात 48-मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. तसेच जगातील पहिला फोन आहे ज्यात फ्रंटला ट्रिपल लेंस कॅमेरा सेटअप आहे. फोन मध्ये f/2.0 सह 48-मेगापिक्सलचा मेन सेंसर, 8-मेगापिक्सलचा 123 डिग्री अल्ट्रावाइड सेंसर आणि एक ToF डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

डिस्प्ले
सॅमसंग गॅलेक्सी A80 मध्ये 6.7 इंचाचा फुल HD+ सुपर ऐमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉलूशन 2400X1080 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये कोणतीही नॉच नाही. याआधी Samsung च्या स्मार्टफोन मध्ये इनफिनिटी-ओ, इनफिनिटी-यू आणि इनफिनिटी-वी डिस्प्ले डिजाइन मिळत होती. या नॉच कट आउट मध्ये सेल्फी कॅमेरा असायचा.

ताकदवान रॅम व स्टोरेज
सॅमसंग गॅलेक्सी A80 मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आलेला नाही.

पावरफुल प्रोसेसर
नॉच विना येणाऱ्या सॅमसंग गॅलेक्सी A80 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730जी ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरची घोषणा क्वॉलकमने अलीकडेच केली होती. तर 730जी चिप सह येणारा हा कंपनीचा पहिला फोन आहे.

दमदार बॅटरी आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम
सॅमसंग गॅलेक्सी A80 मध्ये 3,700एमएएच ची बॅटरी आहे जी 25 वॉट सुपर फास्ट चार्जिंगला सपॉर्ट करते. तसेच गॅलेक्सी A80 फोन एड्रॉइड 9 पाई बेस्ड वन यूआई वर चालतो.