सॅमसंग आपल्या नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए8एस वर काम करत आहे. काही दिवसांपूर्वी या फोनच्या डिस्प्ले संबंधित एक लीक समोर आला होता ज्यावरून समजले होते कि गॅलेक्सी ए8एस मध्ये ‘O’ शेप असलेली नॉच दिली जाईल. आता पुन्हा एकदा गॅलेक्सी ए8एस ची चर्चा टेक बाजारत सुरु आहे. फोन बद्दल नवीन लीक समोर आला आहे ज्यात गॅलेक्सी ए8एस च्या डिजाईन व डिस्प्ले सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए8एस संबंधित या नवीन लीक मध्ये पण हेच स्पष्ट झाले आहे कि सॅमसंगचा हा फोन ‘ओ’ शेप असलेल्या नॉच सह येईल आहे. या फोन मध्ये फ्रंट पॅनलच्या वरच्या बाजूला छोट्याश्या छिद्रात सेल्फी कॅमेरा फिट केला जाईल. विशेष म्हणजे अशाप्रकारची नॉच सह लॉन्च होणारा गॅलेक्सी ए8एस फक्त सॅमसंगचा नव्हे तर संपूर्ण टेक विश्वातील पहिला स्मार्टफोन असेल ज्यात नॉच फोन बॉडी पासून लांब डिस्प्लेच्या आत असेल.
लीकनुसार गॅलेक्सी ए8एस मध्ये 6.39-इंचाचा इनफिनिटी ओ फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. लीकनुसार सॅमसंगचा फोन 59.11 x 74.88 x 7.38 एमएम डायमेंशन सह येईल तसेच नॉच साठी असलेल्या छिद्रांची साईज 6.7एमएम असेल. या फोनच्या फ्रंट पॅनल वर पूर्णपणे डिस्प्ले स्क्रीन असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग आपला हा फोन लेटेस्ट एंडरॉयड व्हर्जन वर सादर करेल तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल.
सॅमसंग गॅलेक्सी ए8एस 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच लीक नुसार या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल, जी कार्ड ने वाढवता येईल. लीकनुसार सॅमसंगचा हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 24-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेेंसर सह 5-मेगापिक्सल तसेच 10-मेगापिक्सलचे दोन अजून कॅमेरा सेंसर पण दिले जातील. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
गॅलेक्सी ए8एस सॅमसंग द्वारा 3,400एमएएच बॅटरी सोबत लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग ने आॅफिशियली गॅलेक्सी ए8एस च्या निर्मितीची तसेच याच्या डिस्प्लेची घोषणा केली आहे. पण हा फोन बाजारात कधी येईल आणि याचे ठोस स्पेसिफिकेशन काय असतील यासाठी कंपनीच्या पुढल्या घोषणेची वाट बघावी लागले. तसेच आता असे पण बोलले जात आहे कि कदाचित सॅमसंग कंपनी गॅलेक्सी ए8एस स्मार्टफोन आपल्या गॅलेक्सी सीरीजच्या दहाव्या वर्धापनदिनी गॅलेक्सी एस10 सोबत टेक मंचावर सादर करेल.
