Home बातम्या 4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च

4 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए9 भारतात लॉन्च

सॅमसंगचा चार रियर कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 आज दीर्घप्रतिक्षेनंतर भारतीय स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाला आहे. कंपनी ने राजधानी मध्ये आयोजित एका ईवेंटच्या मंचावरून गॅलेक्सी ए9 देशात आॅफिशियली सादर केला आहे. गॅलेक्सी ए9 फक्त सॅमसंगचा नव्हे तर संपूर्ण इंडियन टेक बाजारातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्चॉड रियर कॅमेरा म्हणजे चार बॅक कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च झाला आहे. हा फोन फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सोबतच लुक आणि डिजाईन मध्ये पण दमदार आहे.

कॅमेरा
सर्वात आधी कॅमेरा सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए9 के बॅक पॅनल वर 4 ​रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यात एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा ओआईएस सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरे सह बाजारात आणला आहे.

डिजाइन
सॅमसंग गॅलेक्सी ए9 ग्लास पॅनल वर बनला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर पण 3डी कर्व्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच गॅलेक्सी ए9 च्या पॅनल वरील क्वॉड कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये आहे. भारतात हा लेमनेड ब्लू, बबलगम पिंक आणि केवियर ब्लॅक कलर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

डिस्प्ले
गॅलेक्सी ए9 कंपनी द्वारा 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे, ज्याचा फ्रँन्ट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नाही. या फोन मध्ये 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन 6.3-इंचाचा सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे.

रॅम व स्टोरेज
सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 भारतात 2 रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे तर दुसरा वेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्ड ने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

सॉफ्टवेयर व प्रोसेसर
हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस एक्सपीरियंस 8.5 यूआई सह काम करतो. तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने हा फोन 14एनएम आॅक्टा-कोर प्रोसेसर वर सादर केला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रीनो 512 जीपीयू आहे.

कने​क्टिविटी
सॅमसंग गॅलेक्सी ए9 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये वाइफाई, जीपीएस आणि ब्लूटूथ 5.0 सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत एनएफसी तसेच सॅमसंग पे सपोर्ट पण देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी ए9 मध्ये यूएसबी टाइप सी-पोर्ट पण आहे.

सिक्योरिटी व बॅटरी
सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे तसेच हा फोन अनलॉकिंग साठी फेस रिकॉग्निशन फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाल्या 3,800एमएएच बॅटरी सह बाजारात आणला आहे.

किंमत व उपलब्धता
सॅमसंग गॅलेक्सी ए9 चा 6जीबी जीबी रॅम वेरिएंट 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच कंपनी ने फोनच्या 8जीबी रॅम वेरिएंटची किंमत 39,999 रुपये ठेवली आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 28 नोव्हेंबर पासून सेल साठी उपलब्ध होतील. गॅलेक्सी ए9 अमेझॉन, फ्लिपकार्ट व पेटीएम सोबतच एयरटेल स्टोर तसेच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. तसेच एचडीएफसी क्रेडिट कार्ड वर कंपनी 3,000 रुपयांची सूट देत आहे.