सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या टेक्नॉलिजीचा अनोखा नमूना सादर करत जगातील पहिला चार रियर कॅमेरे वाला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 सादर केला होता. हा स्मार्टफोन सध्या मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे. आता आलेल्या बातमी नुसार सॅमसंग लवकरच आपली ए9 स्मार्टफोन सीरीज चीन मध्ये आणणार आहे. बातमी अशी आहे कि सॅमसंग येत्या 24 ऑक्टोबरला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून गॅलेक्सी ए9एस स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.
सॅमसंग गॅलेक्सी ए9एस संबंधित एक टीजर ईमेज इंटरनेट वर शेयर केली आहे ज्यात फोनची लॉन्च डेट व टाईमची माहिती देण्यात आली होती. या आॅफिशियल ईमेज नुसार गॅलेक्सी ए9एस येत्या 24 ऑक्टोबरला दुपारी 4:30 वाजता चीनी बाजारात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे चीन मध्ये लॉन्च होणार गॅलेक्सी ए9एस सॅमसंग द्वारा मलेशिया मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी ए9 चाच दुसरा वर्जन आहे. गॅलेक्सी ए9एस रॅम व प्रोसेसर मध्ये मलेशिया मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए9 पेक्षा थोडा वेगळा आहे.
गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रीनो 512 जीपीयू देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये गॅलेक्सी ए9 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात जी 512जीबी पर्यंत वाढवता येते.
गॅलेक्सी ए9 मध्ये डुअल सिम, एनएफसी आणि सॅमसंग पे सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देनाय्त आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाली 3,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मलेशिया मध्ये 512 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे जी भारतीय करंसी नुसार 43,000 रुपयांच्या आसपास आहे. पण गॅलेक्सी ए9 च्या इंडिया लॉन्च आणि याच्या किंमतीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.
