Home बातम्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आला Samsung चा दमदार 5G फोन; 50MP चा कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी

खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आला Samsung चा दमदार 5G फोन; 50MP चा कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी

सॅमसंगनं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आपले फोल्डेबल स्मार्टफोन सादर केले होते. कालच कंपनीनं या स्मार्टफोन्सच्या भारतीय किंमतीची माहिती देखील दिली. या हायएंड फ्लॅगशिप डिवाइसेसच्या किंमती सर्वांनाच परवडणाऱ्या नाहीत. परंतु दुसरीकडे सॅमसंगनं टेक मार्केटमध्ये एक नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy Buddy 2 सादर केला आहे. ज्याची किंमत मात्र परवडणारी आहे. हा स्मार्टफोन कंपनीनं दक्षिण कोरियात लाँच झाला आहे जो अन्य मार्केट्समध्ये Samsung Galaxy M23 किंवा Samsung Galaxy F23 नावानं आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी बडी 2 भारतातील गॅलेक्सी एफ23 5जी फोन सारखाच आहे. पुढे आम्ही या फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy Buddy 2 चे स्पेसिफिकेशन्स

हा सॅमसंग मोबाइल 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. कंपनीनं यात टियरड्रॉप डिजाईनचा वापर केला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या फोनचे डायमेंशन 165.5 x 77 x 8.4 एमएम आणि वजन 198 ग्राम आहे. हे देखील वाचा: लोकांच्या नजारा ‘वळतील’ असा फोन! Samsung ने लाँच केला फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 4

Samsung Galaxy Buddy 2 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो सॅमसंग वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750जी चिपसेट देण्यात आला आहे. कोरियन मार्केटमध्ये हा फोन 4 जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Buddy 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळतो, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स व 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देखील आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Samsung चा सर्वात शक्तिशाली 5G फोन Galaxy Z Fold 4 लाँच; 5 Camera, 12GB RAM आणि खूप काही

Samsung Galaxy Buddy 2 एक ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्हींना सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येणाऱ्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. साउथ कोरियामध्ये या फोनची प्राइस KRW 399,300 जवळपास 24,000 रुपये आहे.