सॅमसंगने भारतात 4 मार्चला लाँच होणाऱ्या Samsung Galaxy F15 5G च्या किंमतीबाबत संकेत दिला आहे. फ्लिपकार्टवर एक प्रमोशनल बॅनरवरून असे समजले आहे की, अपकमिंग एफ-सीरीज स्मार्टफोनची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. प्रमोशनल बॅनरमध्ये सांगण्यात आले आहे की गॅलेक्सी F15 ची प्रारंभिक किंमत “11,xxx रुपये” असेल, जी 11,999 रुपये असू शकते. फोन 4GB+128GB आणि 6GB+128GB कॉन्फिगरेशन मध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच, एका वेगळ्या रिपोर्टमध्ये, टिपस्टर अभिषेक यादवने सॅमसंग गॅलेक्सी F15 5G च्या किंमतीची माहिती दिली आहे.
Samsung Galaxy F15 5G किंमत (लीक)
टिप्सटरनुसार फोनची किंमत क्रमशः 13,499 रुपये (4GB+128GB) आणि 14,999 रुपये (6GB+128GB) असेल. टिपस्टरने पुढे खुलासा केला आहे की स्मार्टफोन खरेदी करणाऱ्याला बँक ऑफरसह 1,500 रुपयांची सूटचा लाभ मिळेल, ज्याची प्रारंभिक किंमत 11,999 रुपये होईल. तर, शक्यता आहे की 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीची बँक सूट मिळेल.
Samsung Galaxy F15 5G स्पेसिफिकेशन्स (लीक/ऑफिशियल)
- डिस्प्ले: Samsung Galaxy F15 5G फोनला Super AMOLED डिस्प्लेवर लाँच केले जाईल. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असणारी स्क्रीन दिली जाईल, ज्याला सॅमसंग इनफिनिटी ‘यू’ असल्याचे बोलत आहे. सध्या स्क्रीनचा आकार समोर आलेला नाही परतुं अपेक्षा आहे की, फोनचा डिस्प्ले 6.5 इंचापेक्षा मोठा असणाार आहे. तसेच या मोबाईलमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट पण पाहायला मिळू शकतो.
- प्रोसेसिंग: सॅमसंगच्या अधिकृत घोषणा करण्यात आली आहे की गॅलेक्सी ए15 5जी फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटवर लाँच केला जाईल. हा ऑक्टाकोर प्रोसेसर 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे जो 2.2GHz 2X Arm Cortex-A76 आणि 2.0GHz 6X Arm Cortex-A55 सीपीयूवर चालतो.
- कॅमेरा: सॅमसंग गॅलेक्सी एफ15 5जी फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कंपनीची ही लेन्स अजून पडद्यामध्ये ठेवली आहे परंतु आशा आहे की मोबाईलमध्ये 50 मेगापिक्सलचा सेन्सर असू शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि मॅक्रो लेन्स पण पाहायला मिळू शकते. हा कॅमेरा सेटअप वर्टिकली प्लेस्ड असणार आहे.
- बॅटरी: सॅमसंग गॅलेक्सी एफ 15 5 जी फोनची बॅटरी सर्वात मोठी असणार आहे. हा मोबाईल 6,000mAh Battery वर लाँच केला जाईल. ब्रँडकडून अजून चार्जिंग टेक्नॉलॉजीची माहिती देण्यात आली नाही परंतु हे निश्चित आहे की Galaxy F15 5G फोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह असणार आहे.
- ऑपरेटिंग सिस्टम: Samsung Galaxy F15 5G फोन कोणत्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर लाँच होईल हे अजून सांगण्यात आले नाही. तसेच दुसरीकडे कंपनीने या गोष्टीची पुष्टी केली आहे की या आगामी गॅलेक्सी फोनमध्ये 4 वर्षाचे Android Upgrade तसेच 5 वर्षाचे Security Update जरूर मिळेल. म्हणजे आता हा फोन अँड्रॉइड 14 वर आला आहे, हा अँड्रॉइड 18 पर्यंत तयार असणार आहे.
