ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर सध्या इलेक्ट्रॉनिक शॉपिंग डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये 13 हजार रुपयांच्या बजेटमध्ये SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे. SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 750 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया सॅमसंगच्या बजेट 5G स्मार्टफोनवरील ऑफर, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स.
SAMSUNG Galaxy F23 5G चे ऑफर्स
SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. सॅमसंगचा स्मार्टफोन SBI क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास तुम्हाला 750 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच सॅमसंगचा हा फोन EMI वर विकत घेतल्यास 1500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. तसेच Flipkart Axis Bank कार्डवर 5 टक्के डिस्काउंट देखील दिला जात आहे.
SAMSUNG Galaxy F23 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. छोट्या मॉडेलमध्ये 4GB रॅम देण्यात आला असून त्याची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. या दोन्ही व्हेरिएंटवर हा डिस्काउंट दिला जात आहे.
Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.6-इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
- Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर
- 6GB पर्यंत रॅम, 128GB स्टोरेज
- 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
- 13MP सेल्फी कॅमेरा
- 5,000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग
Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass च्या प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉमचा Snapdragon 750G चिपसेट मिळतो. सोबतीला Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित सॅमसंगच्या OneUI 4.1 वर चालतो.
Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
Samsung Galaxy F23 स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. तसेच हा फोन Dolby Atmos आणि Samsung Pay ला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, आणि USB Type-C पोर्ट मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
