Home बातम्या 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

samsung galaxy f52 5g चा फोटो

Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी आपल्या आगामी 5G फोन Galaxy F52वर काम करत आहे. दक्षिण कोरियन टेक कंपनीचा हा फोन आतापर्यंत अनेक सर्टिफिकेशन साइट जसे कि Bluetooth SIG वेबसाइट, TENAA आणि Wi-Fi Alliance वर स्पॉट पण केला गेला आहे. बोलले जात आहे कि फोन लवकरच मार्केटमध्ये सादर केला जाईल. पण, आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. आता 91mobiles ने Samsung Galaxy F52 5G चे स्पेसिफिकेशन गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये स्पॉट केला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या रॅम, चिपसेट, डिस्प्ले रेजोल्यूशन आणि बरीच माहिती समोर आली आहे. (Samsung Galaxy F52 5G specs listed on Google play console launch soon)

Samsung Galaxy F52 5G स्पेसिफिकेशन Google Play Console

Google Play Console लिस्टिंगनुसार Samsung Galaxy F52 5G कंपनी Qualcomm SM7225 चिपसेटसह सादर करू शकते जो स्नॅपड्रॅगॉन 750G असेल. तसेच फोनमध्ये 8GB रॅम असेल. पण, आशा आहे कि डिवाइस यापेक्षा जास्त रॅम वेरिएंटमध्ये लॉन्च केला जाईल. तसेच लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या रेंडर्सवरून स्पष्ट झाले आहे कि फोन डिस्प्लेमध्ये होल-पंच सेल्फी कॅमेरा असेल जो टॉप-राइट कॉनर्रवर असेल. तसेच Samsung Galaxy F52 मध्ये FHD+ (1080×2009) रेजोल्यूशन पण असेल.

हे देखील वाचा : COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी

लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले आहे कि फोन अँड्रॉइड 11 वर चालेल. तसेच गुगल कंसोलवर फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही. पण, डिवाइस मॉडेल नंबर SM-E5260 सह लिस्ट झाला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला स्पॉट करण्यात आलेल्या TENAA लिस्टिंगनुसार, सॅमसंग गॅलेक्सी F52 5G मध्ये 4,350mAh ची बॅटरी आहे आणि याचा आकार 164.63mm × 76.3mm × 8.7 मिमी असेल. 3 सी सर्टिफिकेशनवरून समजले होते कि फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर सुविधा पाहता डुअल-बॅंड वाय-फाय आणि ब्लूटूथ वी 5.1 चा समावेश आहे.

TENAA लिस्टिंगनुसार हा फोन Android 11 सह येईल. फोनमध्ये 6.57 इंचाच्या फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्लेसह येईल. ज्याचे ज्याचा रिजोल्यूशन 1080 x 2408 असेल. तसेच, फोन 2.40GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येईल, सोबत 8 जीबी रॅम मिळेल. फोनची स्टोरेज 128 जीबी असेल, ज्यात माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळेल.

हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि स्लिम डिजाइनसह लॉन्च झाली Vivo V21 सीरीज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल.