Home बातम्या Samsung Galaxy F54 5G ची किंमत लीक; 6 जूनला होईल भारतात लाँच

Samsung Galaxy F54 5G ची किंमत लीक; 6 जूनला होईल भारतात लाँच

Highlights
  • फोनची किंमत टिपस्टर पारसनं लीक केली आहे.
  • ह्यात असेल 108 MP कॅमेरा.
  • ह्यात 8GB RAM + 256GB Storage असेल.

Samsung Galaxy F54 5G फोन येत्या 6 जूनला भारतात लाँच होणार आहे. कंपनीनं सांगितलं आहे की हा सॅमसंग फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह मार्केटमध्ये एंट्री करेल. तसेच आता लाँचपूर्वीच गॅलेक्सी एफ54 5जी फोन प्राइस देखील लीकच्या माध्यमातून समोर आला आहे.

Samsung Galaxy F54 5G ची किंमत (लीक)

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी फोनच्या किंमतीची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून पारसनं माहिती दिली आहे की हा मोबाइल फोन 28,499 रुपयांमध्ये भारतात लाँच होईल. ह्या किंमतीत फोनचा 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज मॉडेल मिळेल. परंतु ठोस किंमतसाठी 6 जूनचीच वाट पाहावी लागेल.

Samsung Galaxy F54 5G स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : लीकनुसार हा सॅमसंग स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच होईल जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.

प्रोसेसर : Samsung Galaxy F54 5G मध्ये एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. लीकनुसार, हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर लाँच केला जाईल.

रियर कॅमेरा : हा स्मार्टफोन 108 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येईल. ह्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये Monster Shot 2.0, Astrolapse, Nightography आणि 16 लेन्स Fun Mode सारखे फीचर्स मिळतील.

सेल्फी कॅमेरा : लीकनुसार, Samsung Galaxy F54 5G फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या सॅमसंग फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जोडीला 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.