Home बातम्या लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा

लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा

Samsung Galaxy F62 चा फोटो

Samsung ने आज भारतात आपली Galaxy F-सीरीज वाढवत नवीन मिड-रेंज स्मार्टफोन Galaxy F62 लॉन्च केला आहे. अनेक दिवसांपासून या फोन बद्दल बातम्या समोर येत होत्या, ज्यांच्यावर आज पूर्णविराम लागला आहे. तुम्हाला माहित असेल कि कंपनीने गेल्यावर्षी एफ-सीरीज मध्ये सर्वप्रथम गॅलेक्सी एफ41 भारतात लॉन्च केला होता. त्याचप्रमाणे गॅलेक्सी एफ62 जगात सर्वप्रथम भारतातच लाॅन्च केला गेला आहे.

लुक व डिजाइन

सर्वप्रथम सॅमसंग गॅलेक्सी एफ62 च्या लुक व डिजाइन बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने पंच-होल डिस्प्लेवर सादर केला आहे. फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजललेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. हा होल बेजल पासून थोडा दूर डिस्प्लेवर आहे. तसेच Samsung Galaxy F62 च्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअपच्या खाली फ्लॅश दिसेल आहे तसेच पॅनलवर सर्वात खाली वर्टिकली Samsung लोगो आहे.

पावरफुल प्रोसेसर

Samsung Galaxy G62 मध्ये कंपनीने स्वतःचा Exynos 9825 चिपसेट दिला आहे. हा चिपसेट कंपनीच्या फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ मध्ये देण्यात आला होता. बेस्ट-इन-क्लास AnTutu 8 452000+ स्कोरसह Samsung फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 मध्ये अनेक इंडस्ट्री-फर्स्ट फीचर्स आहेत. कंपनीनुसार या प्रोससेसरच्या मदतीने Samsung Galaxy F62 एक ऑल-राउंड #FullOnSpeedy डिवाइस बनतो.

पावरफुल बॅटरी

या फोनची यूएसपी फ्लॅगशिप प्रोसेसर सोबत पावरफुल 7000mAh ची बॅटरी पण आहे. फोन मध्ये देण्यात आलेली बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच फोन मध्ये इन-बॉक्स टाइप C 25W सुपरफास्ट चार्जर मिळतो जो स्मार्टफोनची 7000mAh ची बॅटरी 2 तासांपेक्षा कमी वेळात चार्ज करतो. गॅलेक्सी एफ 62 मध्ये रिवर्स चार्जिंग पण देण्यात आली आहे जी दुसरा कोणताही फोन चार्ज करू शकते.

दमदार कॅमेरा

गॅलेक्सी एफ62 मध्ये मागे चौकोनी क्वाड-कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 64MP मेन सोनी आईएमएक्स 682 सेंसर आहे. तसेच गॅलेक्सी F62 वर 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आहे जी 123-डिग्री व्यू कॅप्चर करते. त्याचबरोबर फोन मध्ये 5MP मॅक्रो लेंस क्लोज-अप शॉट्स कॅप्चर करण्यासाठी मिळेल. गॅलेक्सी F62 च्या 5MP डेप्थ सेंसर लेंस मध्ये लाइव फोकस सह अद्भुत पोर्ट्रेट शॉट घेता येतील. फोन मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी F62 चा 32MP फ्रंट कॅमेरा 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्लो-मो सेल्फीला पण सपोर्ट करतो.

सुंदर डिस्प्ले

गॅलेक्सी F62 मध्ये 6.7 “FHD + सुपर AMOLED प्लस इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक इमर्सिव व्यूइंग एक्सपीरियंस देतो. डिस्प्ले 16M कलर्स, 420 Nits पीक ब्राइटनेस आणि 1000000: 1 च्या कॉन्ट्रास्ट रेशिओला सपोर्ट करतो. फोन फक्त 9.5 मिमी जाड आहे आणि याचे वजन फक्त 218 ग्राम आहे.

सॉफ्टवेयर

गॅलेक्सी F62 अँड्रॉइड 11 आणि वन युआय 3.1 सपोर्टसह येतो. तसेच फोन मध्ये युजर्सना AltZLife फीचर पण मिळतो जो स्मार्टफोनची गोपनीयता वाढवतो. गॅलेक्सी एफ 62 आर्मी ग्रेड नॉक्स सिक्योरिटी असलेला पहिला गॅलेक्सी एफ सीरीजचा फोन आहे. गॅलेक्सी F62 सॅमसंग पे (NFC) ला पण सपोर्ट करेल जो तुमच्या फोनमधून UPI, वॉलेट्स, बिल पेमेंट आणि गिफ्टकार्ड तसेच NFC इनेबल्ड POS मशिन्सवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड ऑफलाइन पेमेंट करेल.

किंमत आणि वेरिएंट्स

Galaxy F62 कंपनीने दोन मेमरी वेरिएंट- 6/128GB आणि 8GB/128GB मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोन तीन कलर ऑप्शन-Laser Green, Laser Blue आणि Laser Grey मध्ये लॉन्च केला गेला आहे. Galaxy F62 ची किंमत पाहता कंपनीने 6/128GB वेरिएंट 23,999 रुपये आणि 8GB/128GB वेरिएंट 25,999 रुपयांमध्ये सादर केला आहे.

सेल डेट आणि ऑफर

सॅमसंग गॅलेक्सी एफ62 Flipkart.com, Reliance Digital आणि My Jio retail स्टोर्ससह Samsung.com वर 22 फेब्रुवारीपासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी येईल. फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्राम (एफएसयूपी) चा वापर करून ग्राहक प्रोडक्टची फक्त 70% किंमत देऊन गॅलेक्सी एफ 62 विकत घेऊ शकतील आणि एकवर्षांनंतर ग्राहक एका नवीन गॅलेक्सी सीरीज स्मार्टफोन मध्ये अपग्रेड करू शकतील. त्यामुळे युजर्सना फक्त उर्वरित 30% पैसे देऊन नवीन डिवाइस विकत घेण्याचा ऑप्शन मिळेल. तसेच Reliance Digital / My Jio Store ऑफर मध्ये युजर्सना 10000 पर्यंत एकूण लाभ मिळतील.