Home बातम्या 1 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा घडी होणारा Galaxy Fold स्मार्टफोन, कंपनीने केले कंफर्म

1 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा घडी होणारा Galaxy Fold स्मार्टफोन, कंपनीने केले कंफर्म

साउथ कोरिया की इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने यावर्षी फेब्रुवारी मध्ये आपला घडी होणारा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड लॉन्च केला होता. आता हा फोन भारतात 1 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल, यासाठी कंपनीने अधिकृतपणे मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे.

किंमत

अलीकडेच समोर आलेल्या माहिती नुसार भारतात या फोनची किंमत 1.5 लाख ते 1.75 लाख रुपये असू शकते. Samsung Galaxy Fold ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. Samsung Galaxy Fold घेण्यासाठी आधी यूजर्सना आधी फोनची प्री-बुकिंग करावी लागेल. फोन नुकताच साउथ कोरिया मध्ये लॉन्च करण्यात आला होता.

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगच्या या फोल्डेबल फोन मध्ये 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन घडी करून छोट्या फोन मध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे बाहेरील स्क्रीन 4.6-इंचाची होते. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा आहेत, जे फोन बॉडी मध्ये बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी आहेत. फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/2.2 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

तर दुसरा सेंसर 12एमपी चा आहे जो डुअल पिक्सल ऑटोफोकस, ओआईएस ला सपोर्ट करतो. कंपनीने हा वेरियेबल अपर्चर सह सादर केला आहे. हा एफ/1.5 ते एफ/2.4 पर्यंत शूट करतो. तसेच तिसरा सेंसर टलीफोटो आहे. यात 2एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे. तसेच फोल्डच्या आत पण 10एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 सह येतो. त्याचबरोबर तुम्हाला सेल्फी साठी फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. मेन सेंसर 10एमपी चा आहे जो एफ2.2 अपर्चर सह येतो. तिथे आरजीबी सेंसर आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे आणि तो एफ/1.9 अपर्चर वाला आहे.

Samsung Galaxy Fold एंडरॉयड 9 पाई वर आधारित सॅमसंगच्या नवीन वनयूआई इंटरफेस वर चालतो. या फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. यात एक साथ तीन ऍप सह मल्टी टास्किंग करता येईल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरीज देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बॅटऱ्यांची कपॅसिटी मिळून 4,380एमएएच होते. या दोन्ही बॅटऱ्या वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतील.