Home बातम्या सॅमसंग चा पहिला एंडरॉयड गो फोन गॅलेक्सी जे2 कोर फक्त 6,190 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च

सॅमसंग चा पहिला एंडरॉयड गो फोन गॅलेक्सी जे2 कोर फक्त 6,190 रुपयांमध्ये झाला भारतात लॉन्च

सॅमसंग कडून खुप दिवसांपासून बातमी येत होती की कंपनी एंडरॉयड गो एडिशन वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा गॅलेक्सी जे2 कोर नावाने टेक बाजारात सादर करेल. त्यानुसार आज सॅमसंग इंडिया ने आपला हा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. गो एडिशन मुळे हा फोन कमी स्पेसिफिकेशन्स वर पण फास्ट प्रोसेसिंग करू शकेल. कंपनी ने गॅलेक्सी जे2 कोर 6,190 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म्स वर सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर चे ​फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता याची सर्वात मोठी खासियत हीच आहे की हा फोन एंडरॉयड ओेरियो (गो एडिशन) वर चालतो. कंपनी ने हा 5-इंचाच्या टीएफटी डिस्प्ले सह सादर केला आहे आणि फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 540 x 960 पिक्सल आहे. हा फोन सॅमसंग च्या एक्सनोस 7570 प्रोसेसर वर चालतो आणि फोन मध्ये 1जीबी रॅम देण्यात आला आहे. हा फोन 8जीबी स्टोरेज सह येतो, सोबत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर मध्ये 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला जो एफ/2.2 अपर्चर सह उपलब्ध आहे. कॅमेरा सोबत तुम्हाला एलईडी फ्लॅश पण मिळेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा पण एफ/2.2 अपर्चर सह येतो. डाटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये ड्यूअल सिम सोबत 4जी वोएलटीई देण्यात आली आहे. त्याचबरोबर वाईफाई ब्लूटूथ आणि जीपीएस पण आहे.

एंडरॉयड गो मुळे हा फोन कमी स्पेसिफिकेशन्स व हलका प्रोसेसर असूनही बिनदिक्कतपणे लॅग फ्री वापरता येतो. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 2,600 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर आज पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल. हा गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 6,190 रुपयांमध्ये विकत घेता येईल. गॅलेक्सी जे2 कोर सॅमसंग वेबसाइट सोबतच रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.