Home बातम्या सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, यातील पहिला फोन झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट

सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, यातील पहिला फोन झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट

सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि हि ‘गॅलेक्सी एम’ नावाने बाजारात येईल. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एम सीरीज येताच सॅमसंग गॅलेक्सी जे, गॅलेक्सी आॅन आणि गॅलेक्सी सी सीरीज बंद करेल. तर आता एका ताजा लीक मध्ये सॅमसंगच्या आगामी गॅलेक्सी एम सीरीजच्या फोनची माहिती समोर आली आहे. गॅलेक्सी एम सीरीजचा फोन बेंचमार्किंग साइट वर लिस्ट करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या हा आगामी डिवाईस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच वर सॅमसंगचा हा फोन एसएम-एम205एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंचच्या या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग आपल्या नवीन गॅलेक्सी एम स्मार्टफोन सीरीज वर कम करत आहे आणि लवकरात लवकर ती टेक मंचावर सादर होईल. तसेच गीकबेंच वर एसएम-एम205एफ च्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज चा एसएम-एम205एफ फोन 3जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंग वरून समजेल आहे कि सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनी च्या एक्सनॉस 7885 चिपसेट वर चालेल. सॅमसंग गॅलेक्सी एसएम-एम205एफ ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 1319 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 4074 स्कोर देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे एसएम-एम205एफ मधील एक्सनॉस 7885 चिपसेट याआधी गॅलेक्सी ए8 आणि गॅलेक्सी ए8 प्लस स्मार्टफोन मध्ये पण दिसला होता. हे दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतात. त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीजचा हा आगामी फोन पण तीन रियर कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

गॅलेक्सी एम सीरीज बद्दल अशी चर्चा आहे कि सॅमसंग आपल्या लो बजेट तसेच मीड बजेट सेग्मेंट मध्ये नवीन योजना बनवत आहेत. मीड बजेट सेग्मेंट मजबूत करत गॅलेक्सी ए सीरीज अजूनच चांगली व एडवांस करण्यासोबत यात ताकदवान स्पेसिफिकेशन्स देण्यात येतील. तसेच लो बजेट सेग्मेंट मधील गॅलेक्सी जे व गॅलेक्सी आॅन सीरीज बंद करून त्याजागी अगदी नवीन गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजेट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते. सॅमसंगचा प्रयत्न या सीरीज मध्ये कमी किंमतीती चांगले स्पेसिफिकेशन्स देण्याचा असेल. असे पण म्हणू शकतो कि भारतात शाओमीच्या लो बजेट स्मार्टफोन्स मुळे सॅमसंगला आपली नंबर वन पोजिशन गमवावी लागली आहे त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज ने कंपनी फक्त शाओमीला टक्कर देणार नाही तर भारतीय टेक बाजारात आपला शेयर पण वाढवेल.