काही महिन्यांपूर्वी बातमी आली होती की सॅमसंग आपली जे सीरीज आणि ए सीरीज बंद करून नवीन एम सीरीजची सुरवात करेल. बातमीनुसार गॅलेक्सी एम सीरीजचे फोन 2019 च्या सुरवातीला फोन लॉन्च होऊ शकतात. तर काही बातम्यांमध्ये असा करण्यात आला होता की कंपनीचा हा पहिला फोन असेल जो नॉच स्क्रीन सह सादर केला जाईल. अजून फोनच्या नावाबद्दल अनेक कयास लावले जात आहेत. आज याबद्दल 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यात फोनचे नाव समजले नसून याच्या डिजाइनचा पण खुलासा करण्यात आला आहे.
91मोबाईल्सला हि माहिती इंडस्ट्रीतील एका अश्या सूत्रांकडून मिळाली आहे जो सॅमसंगला जवळून ओळखतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की ”कंपनी सर्वात अशी एम सीरीज अंतर्गत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सादर करणार आहे. या फोन्स मध्ये पहिल्यांदाच वाटर ड्रॉप नॉच दिसेल.”
त्याचबरोबर सांगण्यात आले की ”सॅमसंगचे हे फोन मास प्रोडक्शन साठी गेले आहेत आणि लवकरच लॉन्च होणार आहेत. सर्वात खास बाब म्हणजे या फोन्सची निर्मितीत भारतात केली जात आहे. नोएडा मधील सॅमसंग फॅक्टरी मध्ये गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 ची निर्मिती केली जात आहे.”
गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलले जात आहे की सॅमसंग आगामी दिवसांत या सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. हे स्मार्टफोन्स गॅलेक्सी एम10, गॅलेक्सी एम20 आणि गॅलेक्सी एम30 नावाने बाजारात येतील. या तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये गॅलेक्सी एम10 सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार गॅलेक्सी एम10 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो आणि हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 7870 चिपसेट वर चालेल.
सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 724 स्कोर देण्यात आला आहे तसेच मल्टी कोर मध्ये फोनला 3637 स्कोर मिळाला आहे. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज येताच कंपनी सध्याच्या गॅलेक्सी आॅन सीरीज आणि गॅलेक्सी जे सीरीज बंद करेल. गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत लो बजेट फोन तसेच मीड रेंज वाले स्मार्टफोन लॉन्च केले जातील. सॅमसंग आपली गॅलेक्सी एम सीरीज 2019 च्या सुरवातीलाच सादर करू शकते.
