Samsung संबंधित एक बातमी कालच समोर आली होती कि कंपनीच्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F12 स्मार्टफोन आणि ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा Samsung Galaxy M12 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर लिस्ट झाले आहेत. या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि आता कंपनी लवकरच आपले हे नवीन मोबाईल फोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करेल. सॅमसंगने सध्या आपल्या नवीन डिवायसेजची लाॅन्च डेट सांगितली नाही पण बाजारात येण्याआधी यातील एक सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोन गीकबेंच वर लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.
Samsung Galaxy M12 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर SM-M127F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग आज म्हणजे 11 डिसेंबरची आहे. गीकबेंच वर समजले आहे कि सॅमसंगचा हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल जो 2.0गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. गीकबेंच वर खुलासा करण्यात आला आहे कि प्रोसेसिंगसाठी Samsung Galaxy M12 मध्ये कंपनीचा एक्सनाॅस 850 चिपसेट दिला जाईल.
सॅमसंग गॅलेक्सी एम12 गीकबेंच वर 3 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि बाजारात हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंट्स मध्ये एंट्री घेईल. बेंचमार्किंग स्कोर पाहता गॅलेक्सी एम12 गीकबेंच वर सिंगल कोर मध्ये 178 स्कोर मिळाला आहे तर मल्टी कोर मध्ये 1025 स्कोर मिळवला आहे. गीकबेंच वर फोनचे इतर जास्त स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण या लिस्टिंग नंतर बोलले जात आहे कि येत्या काही दिवसांत लवकरच Samsung Galaxy M12 ची घोषणा होईल.
Samsung Galaxy M12
सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लाॅन्च केला जाऊ शकतो जो पंच होल डिजाईन वर बनला असेल. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 7,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे. आशा आहे कि मोठ्या बॅटरीमुळे फोन मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट पण मिळेल.
लीकनुसार फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो त्याअंतर्गत 5 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 2 मेगापिक्सलचे इतर दोन सेंसर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी लाॅन्चची वाट बघितली जात आहे.
