Home बातम्या 6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च

6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च

Samsung कंपनी एकीकडे फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपला दम दाखवत आहे तसेच लो बजेट मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांसाठी पण एकापेक्षा एक ऑप्शन घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M02 आणि Samsung Galaxy M02s फोन लॉन्च केले होते जे अनेकांच्या पसंतीस पडले, आता लो बजेट मोबाईल युजर्ससाठी कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M12 पण घेऊन येत आहे जो 15 मार्चला भारतात लॉन्च केला जाईल. (samsung galaxy m12 india on 11 march with 6000mah battery)

91मोबाईल्सने सॅमसंग गॅलेक्सी एम12 बाबत काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि या फोनचे प्रोडक्शन नोयडा मधील फॅक्ट्री मध्ये सुरु झाले आहे आणि कंपनी लवकरच भारतीय बाजारात डिवायस लॉन्च करेल. तसेच आता कंपनीने सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर Samsung Galaxy M12 चे प्रोडक्ट पेज लाईव केले आहे. या पेजवर फोनचा फुल फोटो आणि स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत कि गॅलेक्सी एम12 येत्या 11 मार्चला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy M12

सॅमसंग गॅलेक्सी एम12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्याला कंपनीने इनफिविटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल जी स्मूद व्यूइंग एक्सपीरियंस देईल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या सॅमसंग एक्सनॉस चिपसेट दिला जाईल.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. इंटरनॅशनल मार्केट मध्ये हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरसह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक डेप्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : हीरो बनून येत आहेत OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G फोन, वरूण धवनने शेयर केला फोटो

Samsung Galaxy M12 भारतीय बाजारात 6,000एमएएचच्या मोठी बॅटरीसह लॉन्च केला जाईल त्याचबरोबर 15वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मिळेल. कंपनीने सांगितले आहे कि 11 मार्चला लॉन्च झाल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी एम12 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया आणि रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येईल.