91मोबाईल्सने गेल्याच महिन्यात एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि Samsung Galaxy M12 चे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. आता आम्हाला टिप्सटर ईशान अग्रवालने या अपकमिंग लो-कोस्ट फोन बाबत काही आणि एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. फोनच्या मॉडेल नंबर (गॅलेक्सी SM-M127 / SM-F127) च्या आधारावर एक तर हा गॅलेक्सी M12 असेल किंवा गॅलेक्सी F12 असेल. पण आता हे ठरवणे कठीण आहे कि हा कोणता फोन आहे, कारण हा गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी एफ सीरीजच्या स्मार्टफोनकडे इशारा करतो.
टिप्सटर ईशानने असे पण म्हटले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए82 5जी वर कंपनी काम करत आहे जो 2019 मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए80 चा संभावित उत्तराधिकारी आहे. स्मार्टफोन येत्या आठवड्यांमध्ये दक्षिण कोरिया मध्ये सादर केला जाऊ शकतो.
स्पेसिफिकेशन्स
मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम12 किंवा गॅलेक्सी एफ12 6.5 इंचाच्या एचडी + टीएफटी एलसीडी पॅनल सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 6GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज असेल. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये कंपनीची Exynos 850 SoC दिली जाईल.
डिवाइस मध्ये 3 जीबी आणि 4 जीबी सह 32/64 जीबी स्टोरेज असलेले लोअर वेरिएंट पण उपलब्ध असतील. स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. अखेरीस गॅलेक्सी M12 किंवा गॅलेक्सी F12 मध्ये 6,000mAh ची बॅटरी असल्याची आशा आहे. हे स्पष्ट नाही कि यात फास्ट चार्जिंग असेल.
सॅमसंग गॅलेक्सी M12 किंवा गॅलेक्सी F12 च्या मागे क्वाड-कॅमेरा दिला जाईल. यात प्राइमरी 48MP सेंसर सोबत 5MP अल्ट्रा वाइड-अँगल लेंस, 2MP डेप्थ सेंसर आणि 2MP मॅक्रो लेंस असेल. तसेच 8MP चा फोन मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाईल. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर पण असेल, पण या फोनच्या स्थितीची सध्या माहिती मिळाली नाही.
