Home बातम्या शाओमीला मिळाले सॅमसंगकडून चोख प्रत्युत्तर, लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी एम20

शाओमीला मिळाले सॅमसंगकडून चोख प्रत्युत्तर, लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी एम20

सॅमसंग ने आज इंडियन स्मार्टफोन बाजारात आपली नवीन इनिंग सुरु केली आहे. सॅमसंग ने आज एकदम नवी ‘गॅलेक्सी एम’ स्मार्टफोन सीरीज सादर केली आहे. गॅलेक्सी एम सीरीज फक्त आर्कषक लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन्स घेऊन आली नाही तर सोबत या सीरीजचे स्मार्टफोन्स खूप कमी किंमतीती लॉन्च केले गेले आहेत. सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोनने केली आहे. हे दोन्ही फोन सॅमसंगचे सर्वात स्वस्त वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असलेले स्मार्टफोन आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज इंडियन यूजर्स साठी खास यासाठी आहेत कारण संपूर्ण जगात पहिल्यांदा हि सीरीज भारतात आणली गेली आहे. भारतात लॉन्च झाल्यांनंतर गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन इतर देशांत सेल साठी उपलब्ध होतील. सॅमसंग ने गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 शॉपिंग साइट अमेझॉन वर एक्सक्लूसिव विकले जातील. किंमत पाहता गॅलेक्सी एम10 चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 7,990 रुपये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी एम20 चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी/64जीबी वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम20

गॅलेक्सी एम सीरीजचा हा लेटेस्ट फोन ‘यू’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला केला गेला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. गॅलेक्सी एम20 आशाहीच्या ड्रॅगनटेल ग्लासने प्रोटेक्टेड आहे जी डिस्प्ले स्क्रॅच पासून वाचवते. फोनचे तिन्ही किनारे नॅरो बेजल्स सह येतात तसेच साखालच्या बाजूला थोडे बॉडी पार्ट देण्यात आले आहेत. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा आणि मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी एम20 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनोस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एम20 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी एम20 मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.