Home बातम्या Samsung Galaxy M31s भारतात लॉन्च, यात आहे 6000एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा

Samsung Galaxy M31s भारतात लॉन्च, यात आहे 6000एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा

Samsung ने खूप प्रतीक्षेनंतर आज भारतीय बाजारात आपला नवीन आणि दमदार स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या काही दिवसांत सॅमसंग लो बजेट स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये घेऊन आली आहे तर आज मिड बजेट मध्ये आपली दावेदारी सादर करत सॅमसंगने Samsung Galaxy M31s स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन 19,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो येत्या 6 ऑगस्ट पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy M31s

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्यात वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगने या स्क्रीनला इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy M31s कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो सॅमसंग वनयूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यातील बेस वेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरीएंट मध्ये 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M31s क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोन बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M31s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या उजव्या पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत व सेल

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 19,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तर फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,499 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Samsung Galaxy M31s येत्या 6 ऑगस्ट पासून Mirage Black आणि Mirage Blue कलर वेरिएंट मध्ये शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल.