Samsung फॅन्स साठी हे वर्ष खूप खास आहे. कंपनीने एकीकडे आपल्या Galaxy A सीरीजमध्ये मोठे बदल करत शानदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, तर दुसरीकडे स्मार्टफोन मार्केट मध्ये नवीन सुरवात करत गॅलेक्सी एम सीरीज सादर केली आहे. या नवीन सीरीज द्वारे सॅमसंगने वॉटरड्रॉप नॉचची सुरवात पण केली होती ज्यात आता पर्यंत Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत कि या सीरीज मध्ये लवकरच Galaxy M40 स्मार्टफोन पण येईल. आता स्वतः Samsung ने खुलासा केला आहे कि येत्या 11 जूनला Galaxy M40 भारतात लॉन्च केला जाईल.
Samsung India ने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वर Galaxy M40 चे प्रोडक्ट पेज बनवले आहे. हे पेज बनवून कंपनीने खुलासा केला आहे कि येत्या 11 जूनला गॅलेक्सी एम सीरीजचा हा नवीन डिवाईस टेक मंचा येईल. 11 जूनला संध्याकाळी 6 वाजता सॅमसंग Galaxy M40 सादर करेल. फोनच्या लॉन्चची माहिती देण्यासोबतच प्रोडक्ट द्वारे Samsung ने Galaxy M40 च्या फोटो सोबत याची महत्वाची माहिती पण शेअर केली आहे.
इनफिनिटी ओ डिस्प्ले
Galaxy M40 सॅमसंग द्वारा इनफिनिटी ओ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज स्मार्टफोन असेल जो अश्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोन बेजल लेस डिजाईन सह येईल ज्याच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. फोनच्या डिस्प्ले वर वरच्या बाजूला डावीकडे छोटासा छेद दिला जाईल आणि या होल मध्ये Galaxy M40 चा सेल्फी कॅमेरा असेल.
ट्रिपल रियर कॅमेरा
Samsung Galaxy M40 कंपनी द्वारा ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे तीन कॅमेरा सेंसर दिले जातील जे वर्टिकल शेप मध्ये असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश असेल. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मधील कॅमेरा सेंसर्सची माहिती अजूनतरी समोर आली नाही पण कंपनीने याला Ultra Sharp ट्रिपल रियर कॅमेऱ्याचे नाव दिले आहे.
दमदार असतील स्पेसिफिकेशन्स
विशेष म्हणजे Galaxy M40 काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. गीकबेंच वर हा फोन SM-M405F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy M40 कंपनी द्वारा 6जीबी रॅम मेमरी सहा बाजारात येऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच फोन मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असल्याचे पण लीक मध्ये समोर आले आहे.
Galaxy M40 गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला होता ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 6150 चिपसेट होता. आविशेष म्हणजे हे चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेटचे कोडनेम आहे. लीक नुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा मोठ्या व पावरफुल बॅटरी सह येऊ शकतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.
लीक्स नुसार Galaxy M40 च्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. तसेच फोनचा सेल्फी कॅमेरा डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तसेच सेल्फी कॅमेरा सेटअप गॅलेक्सी एस10 सीरीजच्या स्मार्टफोन्स सारखा असेल. Galaxy M40 सॅमसंगचा पहिला मीड रेंज फोन असेल जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करेल. किंमतीबद्दल बोलायचे तर समोर आलेल्या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy M40 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीवर लॉन्च केला जाऊ शकतो.
