Home बातम्या 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा

6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy M42, सोबत मिळेल 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा

Samsung बाबत चर्चा आहे कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या नवीन डिवायस वर काम करत आहे जो Samsung Galaxy M42 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल. सॅमसंगने आतापर्यंत गॅलेक्सी एम3.. आणि गॅलेक्सी एम5.. टायटल असलेले फोन्स बाजारात आणले आहेत पण पहिल्यांदा गॅलेक्सी एम4.. टायटल सह फोन लॉन्च होईल. सॅमसंगने गॅलेक्सी एम42 बाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही पण हा फोन सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे जिथे समजले आहे कि Samsung Galaxy M42 स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy M42 3C सर्टिफिकेशन साइट आणि DEKRA सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे. या दोन्ही वेबसाइट्स वर फोन EM-BM425ABY बॅटरी मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोन मध्ये मधील बॅटरीची रेटेड कपॅसिटी 5,830mAh सांगण्यात आली आहे जिची चार्जिंग लिमिट वॉलटेज 4.43V आहे. हे सर्टिफिकेशन समोर आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम42 स्मार्टफोन 6,000mAh बॅटरी सोबतच बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम42 संबंधित इतर रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन SM-M425F मॉडेल नंबर सह मार्केट मध्ये एंट्री घेईल. रिपोर्टनुसार Samsung Galaxy M42 मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हे लीक्स पाहता अंदाज लावला जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी स्मार्टफोन मिडबजेट मधेच लॉन्च करेल. गॅलेक्सी एम42 कधी मार्केट मध्ये येईल, याबाबत अजूनतरी काही सांगता येणार नाही.

Samsung Galaxy M51

सॅमसंग गॅलेक्सी एम51 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि हँडसेट मध्ये 128 जीबी पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज आहे, जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये मागे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

तसेच रियर कॅमेरा सेटअप प्रमाणे Samsung Galaxy M51 चा सेल्फी कॅमेरा पण शानदार आहे. सॅमसंगचा हा फोन 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो जो डिस्प्लेच्या वरच्या भागात पंच-होल मध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम51 चा फ्रंट कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो.

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट मध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. तसेच फोनच्या मागे एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. सॅमसंगच्या या फोन मध्ये 7000mAh ची बॅटरी आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.