Home बातम्या मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च

मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M51 अमेझॉन इंडिया वर झाला लिस्ट, चीनी फोन्सना टक्कर देण्यासाठी लवकरच होईल भारतात लॉन्च

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपल्या M-सीरीज मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन Samsung Galaxy M51 लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. आता या फोनच्या लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण अलीकडेच 91मोबाईल्सने गॅलेक्सी एम51 ची लाइव इमेज एक्सक्लूसिव शेयर केली होती. आता फोन अमेझॉन इंडिया वर लिस्ट केला गेला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट वर गॅलेक्सी एम51 ‘Meanest Monster Ever’ टॅगलाइन सह दिसला आहे. तसेच फोनची एक माइक्रोसाइट पण बनवण्यात आली आहे. लिस्टिंग वरून समजले आहे कि फोन पंच-होल डिस्प्ले सह येईल. तसेच वेबसाइट वर Galaxy M51 साठी ‘Notify Me’ ऑप्शन दिसत आहे. आशा आहे कि फोन सप्टेंबर मध्ये भारतात येईल.

फोन मध्ये फ्रंटला मध्यभागी पंच-होल डिस्प्ले असेल. अमेझॉन इंडिया पेज वर अशी हिंट मिळाली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 7,000mAh ची बॅटरी आणि एक sAMOLED+ डिस्प्ले असेल. तसेच फोन काही दिवसांपूर्वी गूगल प्ले कंसोल वर पण लिस्ट करण्यात आला होता.

डिजाइन

91मोबाईल्सने अलीकडेच शेयर केलेल्या Samsung Galaxy M51 च्या इमेजनुसार फोन पंच होल डिस्प्ले सह सादर केला जाईल. तसेच फोनच्या मागच्या पॅनल मध्ये एल शेप क्वाड कॅमेरा असेल. कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅश दिला जाईल. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर बटन असेल. बॅक पॅनल मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नसेल, ज्यावरून आशा व्यक्त करण्यात आली आहे कि फोन मध्ये गॅलेक्सी एम31एस मध्ये दिला जाणारा पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर असेल.

स्पेसिफिकेशन्स

गूगल प्ले कंसोल लिस्टिंग वर सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. या नवीन मिड-रेंज फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल. लिस्टिंगनुसार Samsung फोन मध्ये 8GB रॅम आणि फुल एचडी+ स्क्रीन आणि एंडरॉयड 10 ऑपरोटिंग सिस्टम असेल.

अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी M51 मध्ये 6.67-इंचाचा FHD + sAMOLED + डिस्प्ले असेल जो 60Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच हँडसेट मध्ये मागे 64MP चा क्वाड-कॅमेरा सेटअप आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनची यूएसपी याची विशाल 7,000mAh ची बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम51 वीडियो