सॅमसंग लवकरच त्याच्या Galaxy M-सीरीजमध्ये नवीन फोन Galaxy M55s लाँच करण्याच्या तयारीत आहे. तथापि, या आगामी फोनबद्दल कंपनीकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, परंतु लीकमध्ये आतापर्यंत Galaxy M55s बद्दलची बरीच माहिती समोर आली आहे. तर, अलीकडेच हा स्मार्टफोन भारताच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वेबसाईट (BIS) वर दिसला होता, ज्यामुळे त्याच्या भारत लाँचची पुष्टी झाली होती. तसेच, आता डिव्हाईस MySmartPrice च्या टीमने सॅमसंग साईटवर Galaxy M55s चे सपोर्ट पेजला स्पॉट केले आहे. हा फोन Galaxy M55 चे अपग्रेडेड व्हर्जन असेल.
Samsung Galaxy M55s चे सपोर्ट पेज लाईव्ह
सपोर्ट पेज मध्ये आगामी Galaxy M55s चे नाव निश्चित झाले आहे. याची पुष्टी देखील झाली आहे की यात 8 जीबी रॅम असेल. तथापि, आम्हाला आशा आहे की त्यात इतर रॅम पर्याय देखील असतील. दुर्दैवाने, सपोर्ट पेजवर सॅमसंगच्या आगामी मिड-रेंज फोनच्या इतर स्पेसिफिकेशनचा खुलासा करण्यात आलेला नाही.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की Galaxy M55s ची उपस्थिती नोंदवण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम्ही या डिव्हाईसला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वेबसाईट (BIS) वर SM-M558B/DS या मॉडेल क्रमांकासह आधीच पाहिले होते, ज्यामध्ये स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण, त्याच्या भारतीय लाँचची पुष्टी झाली होती.
Samsung Galaxy M55s ची लाँच टाईमलाईन (अपेक्षित)
तुम्हाला सांगतो की सॅमसंगच्या गॅलेक्सी एम-सीरीजची विक्री खास ॲमेझॉनवर केली जाते. त्याचवेळी, अनेकदा असे दिसून आले आहे की कंपनीच्या नवीन एम-सीरीजचा फोन ॲमेझॉनच्या सेलमध्ये विक्रीसाठी येत असतो. त्यामुळे आशा आहे की कंपनी या महिन्यात 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलमध्ये Galaxy M55S ला विक्रीसाठी सादर करेल. तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे.
Samsung Galaxy M55s ची किंमत (अंदाजे)
तुम्हाला आठवण करून देतो की Samsung Galaxy M55 5G या वर्षी एप्रिलमध्ये सादर केला गेला होता, त्याची सुरूवातीची किंमत 26,999 रुपये होती. त्यामुळे Galaxy M55s ची किंमत जवळपास 30 हजार रुपये असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर, लाँच झाल्यानंतर फोन ॲमेझॉन आणि सॅमसंग इंडिया वेबसाईटवर विकला जाईल.
Samsung Galaxy M55s चे स्पेसिफिकेशन (अपेक्षित)
- गिकबेंच सूचीनुसार Samsung Galaxy M55s मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट लावण्यात येऊ शकतो. यामध्ये ग्राफिक्ससाठी ॲड्रेनो 644 जीपीयू मिळू असण्याची शक्यता आहे.
- स्टोरेजच्या बाबतीत डिव्हाईसमध्ये किमान 8 जीबी रॅम दिली जाऊ शकते.
- हा अँड्राईड 14 वर काम करू शकतो. याशिवाय फोनमध्ये 2.4GHz आणि 5GHz वाय-फाय बँडचा सपोर्ट मिळू शकतो.
- गिकबेंच सूचीमध्ये डिव्हाईसने सिंगल-कोरमध्ये 1003 गुण आणि मल्टी-कोर चाचणीमध्ये 2309 गुण मिळवले आहेत. म्हणजे तो चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो.
