Samsung ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘नोट सीरीज’ ची नवीन जेनरेशन सादर केली होती ज्यात Samsung Galaxy Note20 आणि Galaxy Note20 Ultra लॉन्च केले गेले होते. हे दोन्ही डिवाईस हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात जे फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आले आहेत. गॅलेक्सी नोट20 आवडणाऱ्या लोकांना सॅमसंग हा फोन विकत घेण्याची चांगली संधी देत आहे. सॅमसंगचा हा पावरफुल फोन खास ऑफर अंतर्गत 15,000 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
सॅमसंगने आपल्या फॅन्ससाठी ‘Samsung Days’ चे अयोजन केले आहे जो काल म्हणजे 17 सप्टेंबरला सुरु झाला आहे आणि 23 सप्टेंबर पर्यंत चालेल. या स्पेशल ईवेंट अंतर्गत Samsung Galaxy Note20 वर कंपनी थेट 9,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. हा फोन 77,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण डिस्काउंट नंतर हा 68,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
फक्त इतकेच नव्हे तर 9,000 रुपयांच्या डिस्काउंट व्यतिरिक्त ऑफर अंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी नोट20 एचडीएफसी बँक कार्डने विकत घेतल्यास त्यावर 6,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल. म्हणजे या 7 दिवसांत Samsung Galaxy Note20 च्या खरेदीवर एकूण 15,000 रुपयांचा फायदा होत आहे. ‘सॅमसंग डेज’ मध्ये 77,999 रुपयांचा हा पावरफुल फोन 62,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.
वेरिएंट व किंमत
Samsung Galaxy Note20 भारतात 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 77,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Mystic Bronze, Mystic Green आणि Mystic Black कलर मध्ये विकत घेता येईल. दुसरीकडे Samsung Galaxy Note20 Ultra कंपनीने 5जी कनेक्टिविटी सह सादर केला आहे. हा फोन पण 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन पण Mystic Bronze, Mystic Green आणि Mystic Black कलर मध्ये लॉन्च केला आहे जो 1,04,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Samsung Galaxy Note20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)
Samsung Galaxy Note20 Ultra 5G चे डिटेल्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा वीडियो
