Samsung ने काल टेक मार्केट मध्ये आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. कंपनीने गॅलेक्सी नोट सीरीज मध्ये Samsung Galaxy Note20 आणि Galaxy Note20 Ultra 5G स्मार्टफोन आणि गॅलेक्सी टॅब सीरीज मध्ये Samsung Galaxy Tab S7 आणि Galaxy Tab S7+ लॉन्च केले आहेत. तसेच कंपनीचा अनोखा फोल्डेबल फोन Samsung Z Fold 2 आणि Samsung Galaxy Buds व Samsung Galaxy Watch 3 पण बाजारात आले आहेत. ग्लोबल मंचावर मोठा धमाका केल्यानंतर काही तासांनी आता सॅमसंगने गॅलेक्सी नोट 20 सीरीज भारतीय बाजारात पण लॉन्च केली आहे.
वेरिएंट व किंमत
Samsung Galaxy Note20 आणि Galaxy Note20 Ultra 5G भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च केली गेली आहे. सर्वात आधी गॅलेक्सी नोट20 बद्दल बोलायचे तर हा फोन 12 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन को 77,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Mystic Bronze, Mystic Green आणि Mystic Black कलर मध्ये विकत घेता येईल.
सॅमसंग गॅलेक्सी नोट20 अल्ट्रा कंपनीने 5जी कनेक्टिविटी सह सादर केला आहे. हा फोन पण 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा पण Mystic Bronze, Mystic Green आणि Mystic Black कलर मध्ये लॉन्च केला आहे जो 1,04,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
प्री-बुक वर ऑफर
कंपनीने हे दोन्ही पावरफुल फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणले आहेत जे आज पासून संपूर्ण देशात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. हे स्मार्टफोन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सॅमसंग रिटेल स्टोर्स वर पण प्री-बुक करता येतील. कंपनी गॅलेक्सी नोट20 सीरीजच्या प्री-बुकिंग वर 19,000 रुपयांपर्यतचे फायदे देत आहे. तसेच हे दोन्ही फोन नो कॉस्ट ईएमआई वर पण खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy Note20 च्या बुकिंग वर कंपनी द्वारे 7,000 रुपये तर Galaxy Note20 Ultra 5G प्री-बुक केल्यास कंपनी कडून 10,000 रुपयांचे गिफ्ट कूपन मिळत आहेत. या कूपनने सॅमसंग शॉप वर कोणतेही प्रोडक्ट विकत घेता येईल. तसेच एचडीएफसी कार्डने शॉपिंग करणाऱ्या यूजर्सना गॅलेक्सी नोट20 वर 6,000 रुपये तर गॅलेक्सी नोट20 अल्ट्रा 5जी वर 9,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट पण मिळत आहे.
डिजाइन
सर्वात आधी बोलूया गॅलेक्सी नोट 20 स्मार्टफोनच्या डिजाइन बद्दल, यात कंपनीने जुन्या मॉडेल प्रमाणे कर्व्ड डिस्प्ले डिजाइन दिली नाही. यावेळी कंपनीने पूर्णपणे फ्लॅट डिस्प्लेचा वापर केला आहे. फोनचे डिस्प्ले बेजल्स खूप स्लिम आहेत. कंपनीच्या इतर मॉडेल्स प्रमाणे याच्या डिस्प्ले मध्ये पण सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच-होल देण्यात आला आहे. हा डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध देण्यात आला आहे. मागे यात आयताकार कॅमेरा मॉड्यूल आहे. या मॉड्यूल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश मिळेल. तसेच बॉटमला टाइप-सी चार्जिंग प्वाइंट आणि एस-पेन देण्यात आला आहे.
या सीरीज मधील प्रीमियम स्मार्टफोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा ची डिजाइन पाहता हा कर्व्ड डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये बेजल्स खूप बारीक आहेत. कंपनीच्या इतर मॉडेल्स प्रमाणे याच्या डिस्प्ले मध्ये पण सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच-होल देण्यात आला आहे. हा डिस्प्लेच्या वर मधोमध देण्यात आला आहे. तसेच मागे आयताकार कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात तीन कॅमेरे आहेत. Galaxy Note20 कंपनीने Mystic Bronze, Mystic Green आणि Mystic Gray कलर ऑप्शन आणि Galaxy Note20 Ultra: Mystic Bronze, Mystic Black आणि Mystic White कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.
S-Pen
Samsung Galaxy Note 20 सीरीज सह येणारा S-Pen यावेळी अपग्रेड केला गेला आहे. यात Microsoft Gaming कंट्रोल देण्यात आला आहे. फोनचा S-Pen आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो. सोबतच यात आधीच्या सीरीज प्रमाणे अनेक जेस्चर कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत.
Corning Gorilla Glass 7
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 सह येणारा फोन आहे. हे प्रोटेक्शन कंपनीने या सीरीजच्या फक्त प्रीमियम फोन गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा मध्ये दिले आहे. कंपनीचा दावा आहे कि नवीन ग्लास हार्ड, रफ पृष्ठभागांवर 2 मीटर वरून पडल्यावर पण फोनला वाचवू शकते आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 च्या तुलनेत दुप्पट स्क्रॅच प्रतिरोध देते.
Samsung Galaxy Note 20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 मध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड फ्लॅट डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेशियो सह देण्यात आला आहे. या फोनचा 5G मॉडेल 8GB रॅम (LPDDR5) सह 256GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB रॅम (LPDDR5) सह 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. तर डिवाइसचा LTE मॉडेल 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मध्ये सादर केला गेला आहे.
Galaxy Note 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात अपर्चर F2.2 सह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर, अपर्चर F1.8 सह 12-मेगापिक्सलचा वाइड-अँगल शूटर आणि अपर्चर F2.0 सह 64 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेंसर असेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये फ्रंटला अपर्चर F2.2 असलेला 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी Galaxy Note 20 मध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे. फोन IP68 सर्टिफिकेशन सह येतो. तसेच तुम्हाला यात वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग पण मिळत आहे.
Samsung Galaxy Note 20 Ultra चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा फोन मध्ये QHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सह 6.9 इंचाचा कर्व्ड-एज डायनामिक एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच डिवाइसच्या 5G वर्जन मध्ये 12GB रॅम (LPDDR5) सह 512GB इंटरनल स्टोरेज, 12GB रॅम (LPDDR5) सह 256GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB रॅम (LPDDR5) सह 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनच्या LTE वर्जन मध्ये 8GB रॅम (LPDDR5) सह 512GB ची इंटरनल स्टोरेज आणि 8GB RAM (LPDDR5) सह 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 आणि एक्सिनॉस 990 चिपसेट पर्यायांसह बाजारात सादर केला गेला आहे.
इतकेच नव्हे तर वेगवान फाईल ट्रांस्फरसाठी अल्ट्रा-वाइड बॅंड (UWB) टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. सोबतच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी यात अपर्चर F2.2 सह 12-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर, अपर्चर F1.8 सह 108-मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा सेंसर आणि अपर्चर F3.0 सह 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये फ्रंटला अपर्चर F2.2 असलेला 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन एंडरॉयड 10 वर चालतात.
