सर्वांना माहितीच आहे की दरवर्षी सॅमसंग नोट सीरीज मध्ये एक डिवाइस सादर करतो. कंपनी ने आत्तापर्यंत नोट सीरीज च्या 8 आवृत्त्या सादर केल्या आहेत. मागच्या वर्षी गॅलेक्सी नोट 8 सादर करण्यात आला होता. तर यावेळी नोट 9 सादर केला जाईल आणि या फोन च्या बाबतीत बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी नोट 9 सर्टिफिकेशन साइट गीकबेंच वर दिसला होता. तिथे ही माहिती देण्यात आली होती की हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह सादर केला जाईल आणि फोन मध्ये 6जीबी ची रॅम मेमरी असेल.
आज आईस यूनिर्स ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून ही माहिती दिली आहे की सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये 8जीबी रॅम मेमरी असेल. या सोबत 512जीबी ची इंटरनल मेमरी असेल. सॅमसंग बद्दल आईस यनिवर्स ने याआधी पण काही ट्विट केले आहेत आणि ते खरे ठरेल आहेत. त्यामुळे अशा करू शकतो की कंपनी गॅलेक्सी नोट 9 सह 8जीबी रॅम वेरियंट ची सुरवात करू शकते.
पण या ट्विट मध्ये दुसर्या मॉडेल ची माहिती देण्यात आली नाही पण आता पर्यंत आलेल्या बातम्यांनुसार सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये तुम्हाला 6जीबी रॅम सोबत 64/128/256 जीबी मेमरी वाले वेरियंट मिळतील.
पण हा पहिला लीक नाही. याआधी पण या फोन च्या बाबतीत खुलासे झाले आहेत. विशेष म्हणजे कंपनी मेमरी सह इतर काही फीचर्स मध्ये पण बदल करू शकते. मार्च मध्ये बातमी आली होती की सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये स्क्रीन वर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. कंपनी डिस्प्ले वरील फिंगरप्रिंट ची चाचणी करत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी नोट9 चे इतर स्पेसिफिकेशन पाहता नोट8 की प्रमाणे यात पण तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो. त्याचबरोबर कंपनी गॅलेक्सी एस9 प्रमाणे वेरियेबल अपर्चर चा वापर करू शकते. प्रोसेसर आणि रॅम पाहता क्वालकॉम 845 आणि एक्सनोट 9810 चिपसेट चा वापर होईल.
नोट: फीचर फोटो गॅलेक्सी नोट 8 चा आहे नोट 9 चा फोटो वेगळा असेल.
