अनेक दिवस चर्चेत रोहिल्यांनंतर अखेरीस ती वेळ आलीच, सॅमसंग ने आपला फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस10 सादर केला आहे. कंपनी ने अमेरिकेतील सॅनफ्रांसिस्को मधील एका इवेंट मध्ये हे फोन्स सादर केले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत गॅलेक्सी एस सीरीज मध्ये एक किंवा दोन फोन लॉन्च व्हायचे पण यावेळी कंपनी ने चार फोन आणले आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस, गॅलेक्सी एस10ई आणि गॅलेक्सी एस10 5जी सादर केले आहेत. पण यात सर्वात जास्त चर्चा गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस होत आहे जे खूप दमदार आहेत. कंपनीने पहिल्यांदा 12जीबी रॅम असलेला फोन सादर केला आहे. सोबत मोठी मेमरी पण आहे आणि दमदार कॅमेरा पण आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज फोन लॉन्च मध्ये सुजान डिसिल्वा, डायरेक्टर प्रोडक्ट सॅमसंगचे म्हणणे होते कि “सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस सह आम्ही जगातील पहिला इनफिनिटी ओ डिस्प्ले असलेला फोन लॉन्च करत आहोत जो सुपर एमोलेड डिस्प्ले सह येतो आणि यह एचडीआर10 सपोर्ट करतो. तसेच त्यांनी असे पण सांगितले कि हा जगातील पहिला फोन आहे ज्यात अल्ट्रासोनिक इनडिप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर वापरण्यात आला आहे.”
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस ची डिजाइन
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस ची डिजाइन पाहता हे फोन्स पण आधी लॉन्च एस किंवा नोट सीरीजच्या प्रमाणे ग्लास बॅक पॅनल सह सादर केले गेले आहेत पण जुन्या फोन पेक्षा थोडे मोठे आहेत. दोन्ही फोन कंपनी ने ट्रिपल कॅमेऱ्यासह सादर केले आहेत जो हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. सोबत फ्लॅश लाईट आहे. गॅलेक्सी एस10 प्लस के फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या वर उजवीकडे दोन छोटेशे छिद्र देण्यात आले आहेत. या दोन्ही छिद्रात डुअल कॅमेरा सेंसर आहे. तसेच गॅलेक्सी एस10 मध्ये तुम्हाला सिंगल कॅमेरा सेंसर मिळेल. कंपनी ने पंच होल स्टाइल मध्ये सेल्फी कॅमेरा दिला आहे. याआधी चीन मध्ये सॅमसंग ने गॅलेक्सी ए8एस सादर केला होता जो जगातील पहिला पंच होल वाल कॅमेरा होता. याला कंपनी ने इनफिनिटी होलचे नाव दिले होते.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस आईपी68 रेटेड आहेत ज्यामुळे ते दिढ मीटर पाण्यात जवळपास 30 मिनटे राहून पण खराब होणार नाहीत. सोबतच फोन धूळरोधक पण आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लसचा डिस्प्ले
नावाप्रमाणेच गॅलेक्सी एस10 प्लसची स्क्रीन थोडी मोठी आहे. कंपनी ने सॅमसंग गॅलेक्सी एस10 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.1-इंचाची कर्व्ड डायनेमिक सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.4-इंचाची कर्व्ड डायनेमिक सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोन क्वाड एचडी+ (1440 x 3040) पिक्सल रेजल्यूशनला सपोर्ट करतात आणि बेजल लेस डिस्प्ले सह येतात.
इतकेच नव्हे तर यात एचडीआर10 आणि ऑलवेज़ ऑन डिस्प्ले सपोर्ट पण आहे. राहिला प्रश्न प्रोटेक्शनचा तर कंपनी ने हे फोन गोरिल्ला ग्लास 6 ने सुसज्ज केले आहेत जी कोर्निंगची नवीनतम प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस चा रॅम व प्रोसेसर
तुम्हाला तर माहितीच आहे सॅमसंग आपले फ्लॅगशिप फोन नेहमी क्वालकॉम आणि एक्सनोस सहित दोन चिपसेट वर लॉन्च करते आणि यावेळी पण असेच झाले आहे. यूएस मध्ये हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर होई तर भारतासह दुसऱ्या देशात एक्सनोस एक्नोस 9820 चिपसेट असलेला फोन येईल. यात तुम्हाला 8 नॅनोमीटर फॅबरिककेशन वाला ऑक्टाकोर (2×2.7 गीगाहट्र्ज मॉनगूज एम4 + 2×2.3 गीगाहट्र्ज कोर्टेक्स-ए75 आणि 4×1.9 गीगाहट्र्ज कोटेक्स-ए55) मिळेल.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत या फोन मध्ये 128जीबी आणि 512जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 512जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस 8जीबी आणि 12जीबी रॅम सह सादर केला गेला आहे. तसेच कंपनी ने यात 128जीबी, 512जीबी आणि 1टीबी मेमरी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मेमरी असलेला फोन आहे. सोबत 512जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट पण आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस चा कॅमेरा
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस च्या बॅक पॅनल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा मेन कॅमेरा 12-मेगापिक्सलचा आहे जो वेरियेबल अपर्चर सह येतो. हा सेंसर एफ/1.5 अपर्चर पासून एफ/2.4 पर्यंत सपोर्ट करतो. यात वाइड एंगल सह ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट देण्यात आला आहे. असे आपण आधीपण एस10 प्लस आणि नोट9 मध्ये बघितले आहे. तसेच सेकेंडरी कॅमेरा पण 12-मेगापिक्सल एफ/2.4 अपर्चर वाला आहे. हा सेंसर टेलीफोटो लेंस आहे. तसेच तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.4 अपर्चर क्षमता असलेला आहे. फोन मध्ये 2एक्स ऑप्टिकल आणि 10 एक्स डिजिटल जूम सपोर्ट आहे.
गॅलेक्सी एस10 मध्ये 8-मेगापिक्सलची सिंगल सेल्फी लेंस आहे जी एफ/1.9 अपर्चर सह येते. तसेच गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये तुम्हाला 10-मेगापिक्सल (एफ/1.9 आर्चर) + 8-मेगापिक्सल (एफ/2.2 अपर्चर) चा डुअल सेंसर मिळेल. यात दूसरा सेंसर आरजीबी आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी पण उपयोगी पडतो.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस चा ओएस
सॅमसंगचे हे दोन्ही फोन कंपनीच्या नवीन वन यूआई वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई आधारित आहें. हा एंडरॉयडचा नवीन ओएस आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस मधील कनेक्टिविटी ऑप्शन
दोन्ही मॉडेल मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. सोबत 4जी वोएलटीई, वाईफाई आणि ब्लूटूथ पण देण्यात आली आहे. या फोन्स सह कंपनी ने इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरवात केली आहे. त्याचबरोबर फेस डिटेक्शन पण आहे.
पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये तुम्हाला 4,000 चा पावर बॅकअप मिळेल. कंपनी ने यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला जात आहे जो फार्स्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त वायरलेस चार्जिग पण आहे.
कधी येतील भारतात
6 मार्चला हे फोन भारतात लॉन्च केले जातील. चांगली बाब अशी कि या फोन्सचे सर्व मॉडेल भारतात उपलब्ध होतील ज्यात 12जीबी रॅम असलेला फोन पण आहे. राहिला प्रश्न किंमतीचा तर पन्नास हजारापासून 1 लाखापर्यंत याच्या किंमती असतील.
