Samsung ने सप्टेंबर मध्ये आपल्या पावरफुल ‘गॅलेक्सी एस20’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy S20 Fan Edition लॉन्च केला होता जो एका महिन्यानंतर भारतीय बाजारात पण येईल. सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफईने ग्लोबल मार्केट मध्ये जिथे 5G सपोर्टसह आला होता तर भारतात हा फोन 4G कनेक्टिविटीसह लॉन्च झाला होता. आता बातमी समोर येत आहे कि सॅमसंग या फोनचा 5G मॉडेल पण भारतात घेऊन येणार आहे जो भारतीय सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे.
Samsung Galaxy S20 FE 5G इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोन SM-G781B/DS मॉडेल नंबरसह स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमुळे स्पष्ट केले आहे कि कंपनी गॅलेक्सी एस20 एफईचा 5जी मॉडेल पण भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर पण नवीन गॅलेक्सी एस20 एफई चे सपोर्ट पेज पण लाईव झाले आहे. देशातील Samsung Galaxy S20 FE एक्सनॉस 990 चिपसेट वर चालतो तसेच आगामी नवीन 5जी मॉडेल मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट मिळू शकतो.
Samsung Galaxy S20 FE
Samsung Galaxy S20 FE कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वरच्या बाजूला फक्त मधोमध फक्त 3.34mm साईजचा सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर चालतो.
हे देखील वाचा : Nokia चा नवीन स्मार्टफोन वेबसाइटवर झाला लिस्ट, 5G सह लो बजेट मध्ये करू शकतो एंट्री
Samsung Galaxy S20 FE अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.73 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट आक्टा-कोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेला सॅमसंगचा पावरफुल एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एस20 एफई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर वरच्या बाजूला डावीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE एफ/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा : Samsung च्या वेबसाइट वर आले Galaxy F62, F12, A72 आणि A52 5G, जाणून घ्या धमाकेदार फोन्सबाबत सर्वकाही
Samsung Galaxy S20 Fan Edition आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस20 एफई मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलीली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ओटीजी आणि वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. या फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 53,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई व्हिडीओ
