Home बातम्या Samsung Galaxy S20 FE लॉन्च, या शानदार फोन मध्ये आहे 8GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी

Samsung Galaxy S20 FE लॉन्च, या शानदार फोन मध्ये आहे 8GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी

Galaxy S20 FE

Samsung ने आज टेक मार्केट मध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन फ्लॅगशिप डिवाईस Samsung Galaxy S20 Fan Edition सादर केला आहे. हा फोन ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेला एक हाईएंड फोन आहे जो आर्कषक डिजाईन सह प्रीमियम लुक देतो. ग्लोबल लॉन्च सोबतच सॅमसंगने आपला हा फोन भारतीय बाजारात पण आणला आहे जो येत्या काही दिवसांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S20 FE म्हणजे फॅन एडिशन बाबत.

डिस्प्ले

Samsung Galaxy S20 FE कंपनीने इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईनला सपोर्ट करतो ज्याच्या वर मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पंच-होलचा आकार फक्त 3.34mm आहे. सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेट वर विजुअल क्वॉलिटी देतो.

प्रोसेसिंग

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंग वन यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 64बिट 7नॅनोमीटर फेब्रिकेशन वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात LPDDR5 8 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा समावेश आहे. हा सॅमसंग फोन 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

कॅमेरा

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे असलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Samsung Galaxy S20 FE कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो ज्यामुळे हा फोन वेगाने चार्ज केला जाऊ शकतो. सॅमसंगचा हा फोन वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो तसेच गॅलेक्सी एस20 एफई च्या माध्यमातून दुसरा स्मार्टफोन पण वायरलेसने चार्ज केला जाऊ शकतो.

शानदार फीचर्स

फोनचे इतर खास फीचर्स पाहता Galaxy S20 FE सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबतच फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड आहे म्हणजे हा वॉटरप्रूफ आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20 फॅन एडिशन Cloud Navy, Cloud Lavender, Cloud Mint, Cloud Red, Cloud Orange आणि Cloud White कलर मध्ये बाजारात आला आहे.