Home बातम्या Exclusive: 49,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy S20 FE, लवकरच करेल एंट्री

Exclusive: 49,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy S20 FE, लवकरच करेल एंट्री

Galaxy S20 FE

Samsung ने गेल्या महिन्यात टेक मार्केट मध्ये आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत नवीन फ्लॅगशिप डिवाइस Samsung Galaxy S20 Fan Edition सादर केला होता. आता हा दमदार फोन लवकरच भारतात येण्यासाठी तयार आहे. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेलाच हा हायएंड फोनच्या इंडिया लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण त्याआधी 91mobiles ला रिटेल सोर्स कडून या अपकमिंग स्मार्टफोनच्या किंमतीबाबत माहिती मिळाली आहे. रिपोर्ट नुसार फोन 49,999 रुपयांमध्ये भारतात येईल जो सॅमसंगचा यावर्षीचा स्वस्त फ्लॅगशिप फोन असेल.

स्पेसिफिकेशन्स

यात 6.5-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 20: 9 आस्पेक्ट रेशियो आणि 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. Galaxy S20 FE के 4जी वेरिएंट मध्ये ऑक्टा-कोर Exynos 990 चिपसेट मिळतो. फोनच्या 5जी ऑप्शन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आहे. डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे.

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, एफ/1.8 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Galaxy S20 FE स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S20 FE कंपनीने 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आला आहे. हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो त्यामुळे फोन वेगाने चार्ज केला जाऊ शकतो. सॅमसंगचा हा फोन वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो तसेच गॅलेक्सी एस20 एफईच्या माध्यमातून दुसरा स्मार्टफोन पण वायरलेसली चार्ज केला जाऊ शकतो.