Samsung ची Galaxy S सीरीज नेहमीच दमदार असते आणि आज कंपनीने 2020 मध्ये नवीन Galaxy S20 सीरीज सादर केली आहे. कंपनीने एक साथ तीन फोन लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy S20 आणि Samsung Galaxy S20+ सह Galaxy S20 Ultra आला आहे जो अल्ट्रा पावर मुळे कोणत्याही फोनला मात देऊ शकतो. कंपनीने हा खूप दमदार प्रोसेसर सह सादर केला आहे तसेच 16जीबी रॅम मुळे याची उंची अजून वाढते. मोठी बॅटरी आणि 100X जूम सारखे फीचर्स पण या फोनची शान वाढवतात. Galaxy S20 आणि Galaxy S20+ ची माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. पुढे आम्ही Samsung Galaxy S20 Ultra बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
लुक व डिजाईन
Samsung Galaxy S20 Ultra कंपनीने फुल व्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध पंच-होल देण्यात आला आहे ज्याला कंपनीने इनफिनिटी ओ चे नाव दिले आहे. या पंच होल मध्ये सेल्फी कॅमेरा फिट आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा ची स्क्रीन दोन्ही बाजुंनी कर्व्ड आहे. तसेच रियर पॅनल पाहता त्यावर उजवीकडे क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकोनी आकाराचा आहे. तीन कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट चौकोनी आकारात वरच्या बाजूला आहे तसेच याच्या खाली डेफ्थ विजन कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. या लेंसच्या बाजूला Space Zoom 100X लिहिण्यात आले आहे. अर्थात तुम्ही समजू शकता कि यात 100X पर्यंत Zoom सपोर्ट आहे. याची बॉडी ग्लास ने बनली आहे जी प्रीमियम वाटते.
सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला कंपनीची ब्रॅंडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर सह यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. Samsung Galaxy S20 Ultra चे डायमेंशन 166.9 x 76.0 x 8.8एमएम आहेत तर फोनचे वजन 220ग्राम आहे. हा फोन Cosmic Grey आणि Cosmic Black कलर मध्ये लॉन्च झाला आहे.
डिस्प्ले
Samsung Galaxy S20 Ultra फक्त आकारत मोठा नाही तर शानदार विजुअल क्वॉलिटी असलेल्या डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये 3200 X 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.9 इंचाचा क्वॉड एचडी+ डायनामिक एमोलेड 2एक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन एचडीआर10+ सर्टिफाइड आहे आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. कंपनीने माहिती दिली आहे कि बाय डिफॉल्ट हा 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर असतो त्यामुळे 120हर्ट्जसाठी तुम्हाला सेटिंग ऑन करावी लागेल.
कॅमेरा सेग्मेंट
Samsung Galaxy S20 Ultra क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याचा मेन कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तसेच यात वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी ओआईएस व पीडीएएफ सारख्या फीचर्स सह येते. त्याचबरोबर या फोन मध्ये एफ/3.5 अपर्चर असलेली 48 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे आणि सोबत ओआईएस व पीडीएएफ सपोर्ट देण्यात आला आहे. तिसरा सेंसर एफ/2.2 अपर्चर सह येतो आणि कंपनीने 12 मेगापिक्सलची लेंस दिली आहे. हि लेंस अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करते. फोटोग्राफी शानदार व्हावी म्हणून रियर कॅमेरा सेटअप सह खाली डेफ्थ विजन कॅमेरा लेंस पण आहे.
सेल्फीसाठी कंपनीने Samsung Galaxy S20 Ultra एफ/2.2 अपर्चर असलेला 40 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
प्रोसेसिंग
दरवेळी आपण पाहतो कि सॅमसंग आपले फ्लॅगशिप फोन दोन प्रोसेसर सह सादर करते. यावेळी पण असेच झाले आहे. कंपनीने हा एएक्सिनोस 910 आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर सादर केला आहे. भारतात Samsung Galaxy S20 Ultra एक्सिनोस चिपसेट सह उपलब्ध होईल. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 7 एनएस फॅब्रिकेशन असलेला प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड सह येतो. कंपनीने 64बिट्स असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर केला आहे.
सॉफ्टवेयर
हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस यूआई 2.0 वर चालतो. त्याचबरोबर तुम्हाला वाईफाई कॉलिंग आणि स्मार्ट स्क्रीन आणि सॅमसंग डेक्स सारखे फीचर्स मिळतील ज्यात तुम्ही तुकम फोन एखाद्या केबलच्या माध्यमातून स्क्रीन वर कास्ट करू शकता.
रॅम व स्टोरेज
Samsung Galaxy S20 Ultra ग्लोबल मंचावर तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा सर्वात मोठा वेरिएंट 16 जीबी रॅम मेमरी सह 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी देण्यात आली आहे आणि तिसरा वेरिएंट 12 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे तिन्ही वेरिएंट LPDDR5 रॅम सह येतात आणि 5G व LTE दोन्ही कनेक्टिविटीला सपोर्ट करतात.
सिक्योरिटी व बॅटरी
Samsung Galaxy S20 Ultra कपंनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह लॉन्च केला आहे. त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 45वॉट सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा टाईप सी पोर्ट सोबत वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चार्ज केला जाऊ शकतो.
वॉटरप्रूफ
हा फोन आईपी68 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा पाणी व धुळीपासून वाचतो. हा फोन दीड मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकतो.
