काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy S23 FE ची डिजाईन समोर आली होती. हा फोन तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल अशी चर्चा देखील रंगली होती. परंतु आता आल्या आलेल्या बातमीनुसार Galaxy S23 FE हा एकमेव फॅन एडिशन नाही ज्यावर कंपनी काम करत आहे. टिपस्टर तरुण वत्सानं दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग Galaxy S21 FE पुन्हा लाँच करण्याची तयारी करत आहे.
Samsung Galaxy S21 FE जुलैमध्ये पुन्हा येणार
तुम्हाला आठवत असेल की सॅमसंगनं Galaxy S21 FE गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सादर केला होता. ह्या डिवाइसमध्ये कंपनीचा Exynos 2100 चिपसेट देण्यात आला होता. आता नवीन लिक्समधून समोर आलं आहे की भारतात पुन्हा नव्याने लाँच होणाऱ्या Galaxy S21 FE मध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला जाईल.
वत्सनं माहिती दिली आहे की स्नॅपड्रॅगन चिपसेट असलेला Galaxy S21 FE स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात येईल. त्यानं सांगितलं आहे की ह्या हँडसेटची किंमत 40,000 रुपयांच्या असपास असेल. एस21 एफईच्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र मिळाली नाही. त्यामुळे ह्यात चिपसेट व्यतिरिक्त इतर बदल दिसणार नाहीत असं अपेक्षित आहे.
Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो.
- प्रोसेसर आणि ओएस : Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2100 चिपसेट दिला आहे.
- कॅमेरा : फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक 12एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी 12एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक 8 मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
- बॅटरी : पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं आपला फोन 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे.
- अन्य फीचर्स : हा सॅमसंग फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी सह 4जी देखील वापरता येतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा सॅमसंग मोबाइल 3.5एमएम जॅक व एनएफसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.
