सॅमसंग आपल्या प्रीमियम गॅलेक्सी S23 सीरीजचा फॅन एडिशन मॉडेल Samsung Galaxy S23 FE सादर करण्याची तयारी करत आहे. दरम्यान हा मोबाइल बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला आहे. ह्यात फोनच्या काही खास स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला आहे. तसेच याआधीही स्मार्टफोनची बरीचशी माहिती लीक झाली आहे. चला जाणून घेऊया लेटेस्ट लिस्टिंग आणि स्पेक्सची माहिती.
Samsung Galaxy S23 FE गीकबेंच लिस्टिंग
- सॅमसंगचा मोबाइल गीकबेंच बेंचमार्किंग साइटवर SM-S711B मॉडेल नंबरसह दिसला आहे.
- लिस्टिंगमधून समजलं आहे की हा डिवाइस 8GB रॅम आणि s5e9925 नावाच्या मदरबोर्डसह लिस्ट झाला आहे.
- असा अंदाज लावला होता की हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच होईल. परंतु हा डिवाइस Exynos 2200 चिपसेटसह समोर आला आहे.
- Exynos 2200 चिपसेट सध्याच्या इंडस्ट्री स्टँडर्डनुसार खूप जुना वाटतो.
Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स (लीक)
- डिस्प्ले : Samsung Galaxy S23 FE डिवाइसमध्ये 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळेल, असं समजलं आहे. डिस्प्लेवर पंच-होल कटआउट डिजाइन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
- प्रोसेसर : आतापर्यंत अंदाज लावला जातो होता की हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल, गीकबेंच लिस्टिंग मात्र वेगळंच काही तरी दाखवत आहे. लिस्टिंग नुसार हा Exynos 2200 चिपसेटसह येईल.
- स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइस 8GB रॅमसह लिस्टिंगमध्ये समोर आला आहे. इंटरनल स्टोरेज पाहता डिवाइस 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेजसह येऊ शकतो.
- बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 4500mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच होऊ शकतो.
- कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता ह्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात बॅक पॅनलवर 8MP ची टेलीफोटो लेन्स, 12MP ची अल्ट्रा वाइड-अँगल लेन्स आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- ओएस : हा मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.
